पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (दि.२५) बारावीचा निकाल निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, तो ९६ टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबईचा ८८.१३ आहे. पुण्याचा निकाल ९३.३४ लागला आहे. राज्यात पुण्याने निकालाच्या टक्केवारीत दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल सर्वांना पाहता येईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात ही परीक्षा झाली होती. बारावीला राज्यातून १४ लाख २८ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १६ हजार ३७१ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ जण उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण टक्केवारी ९१.२५ आहे.
नोंदणी झालेले विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी
पुणे २४२७३४ २२४६६५ ९३.३४नागपूर १५३२९६ १३७४५५ ९०.३५औरंगाबाद १६६५५१ १५११४८ ९१.८५मुंबई ३३११६१ २९०२५८ ८८.१३कोल्हापूर ११८७९१ ११०११० ९३.२८अमरावती १३९७६९ १२८५२१ ९२.७५नाशिक १५९९८७ १४५७४९ ९१.६६लातूर ८९७८२ ७९५७२ ९०.३७कोकण २६१२३ २४९९० ९६.०१
एकूण १४,२८,१९१ १२,९२,४६८ ९१.२५