पुणे : कोकण हा निसर्गाने नटलेला सौदर्यबहार प्रदेश आहे. गोव्यापेक्षा चांगले बिच कोकणात आहेत. मात्र जोपर्तंय आपण त्याचे ब्रँडींग करत नाही, तोपर्यंत ते पर्यटकांपर्यंत पोहचणार नाही, असे मत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि एक्झीकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने मगरपट्टा सिटी येथे "ग्लोबल कोकण महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन तुळशी वृंदावनास पाणी घालून मुख्यमंत्री दैवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कोकणातीस रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे कोकणातील पर्यटकांची संख्या वाढेल आणि जागतिक पर्यटनांत कोकण पर्यटनाचे महत्ताचे स्थान निर्माण होईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या वतीने कोकणातील पर्यटन विकासासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. कोकणात दोन ठिकाणी विमानतळांचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांची उद्घाटने केली जाणार आहेत.
याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, पालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महोत्सवाचे संयोजक संजय यादवराव, एम. क्यु. सय्यद आदी उपस्थित होते.