सामान्यतः लग्न पत्रिकेत आहेर स्विकारले जाणार नाही अशी टिप असते. पण गव्हाणे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात पत्रिकेत फक्त पुस्तकाचे आहेर स्विकारले जातील अशी टिप दिली. पै पाहुण्यांनी व मित्र मंडळीनी भाऊंचे उपक्रमाचे स्वागत करुन तब्बल ३५९ पुस्तके आहेर म्हणून भेट दिली. विशेषतः त्याच्या या उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली व त्यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. आत्तापर्यंतच्या त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या म. गांधी तंटामुक्ती पत्रकारिता राज्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार, महात्मा फुले साहित्य पुरस्कार असे तब्बल तीन पुरस्कारने सन्मानित केले आहे.
यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य विक्रम गव्हाणे, केशव फडतरे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, सदस्या वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, शैला फडतरे, कोमल खलसे, मनिषा गव्हाणे, राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, ज्येष्ठ पत्रकार के.डी.गव्हाणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील भांडवलकर, पत्रकार उदयकांत ब्राम्हणे, ग्रामसेवक गुलाब नवले, भाजपचे संपत गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काशीद, गणेश फडतरे, सुधिर कंद, ग्रंथपाल सरस्वती कुंभार, रेखा खैरमोडे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर गव्हाणे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक - १८ कोरेगाव भीमा के.डी. गव्हाणे
छायाचित्र ओळ - कोरेगाव भीमा जय हिंद मोफत वाचनालयात पुस्तके भेट देताना पत्रकार शरद पाबळे सरपंच अमोल गव्हाणे, व के.डी. गव्हाणे.
Attachments area