पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेच्या या आयोजनात नक्षलवाद्यांचा सहभाग होता. एल्गार परिषदेच्या या कार्यक्रमाला नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला आहे. काल सुधिर ढवळेसह पाच जणांना अटक केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता सुनावणी कोर्टात सुनावणी झाली आहे. इतर चार जणांना तीन वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
काल अटक केलेल्या आरोपींचे नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. नक्षलवाद्यांशी संबध याच मुद्द्यावर पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींचा कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी संबंध आहे का ? याचा तपास केला जाणार आसल्याची माहिती पुणे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते. या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी 8 जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये ता.1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.