शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Koregaon- Bhima Violence : सीआयडीकडून राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 1:30 PM

कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं सीआयडीकडूनजारी करण्यात आली आहेत.

पुणे -  कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं सीआयडीकडूनजारी करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं जारी केली आहेत. या तिन्ही आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे.

राहुल फटांगळे हत्या प्रकरणी एक व्हिडीओ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) हाती आला आहे. व्हिडीओमध्ये फटांगळेला काही व्यक्ती काठीने मारत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या आधारे सीआयडी चार संशयितांचा शोध घेत आहे.  व्हिडीओच्या त्याआधारे चार जणांचे फोटोदेखील सीआयडीने प्रसिद्ध केले आहेत. आरोपींबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी सीआयडीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  शिक्रापुर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भादंवि ३०२, १४३, १४७,१४८,१४९, सह मुंबई पो.अधि. १९५१ चे कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास 5 फेब्रुवारी रोजी सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. फटांगळे हत्या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन जण अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. तर एकजण औरंगबादचा रहिवासी आहे. त्यांच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर व्हिडीओच्या आधारे सीआयडी आणखी चार संशयितांचा शोध घेत आहे, अशी माहिती सीआयडीचे पोलीस अधीक्षक पी. पी. अक्कानवरू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

सन्मान मोर्चामध्ये राहुल फटांगळेच्या आईचा आक्रोशकोरेगाव-भीमा आणि परिसरात झालेल्या हिंसाचारात  राहुल फटांगडे (वय ३० वर्ष) तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलची हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने व्हिडीओ फुटेज, मोबाइल कॉल रेकॉर्ड, मोबाइल ड्रम डाटा, सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील तिघांना अटक केली होती. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असा दावा पोलिसांनी केला होता.

नेमके काय आहे प्रकरण?1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा करत असताना,  परिसरात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झाले. या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकदेखील झाली. यात राहुल फटागंळे मृत्युमुखी पडला.

 

सहकार्य करण्याचे आवाहन

सीआयडीला स्थानक पोलिसांकडून दंगलीची व्हिडीओ क्लीप मिळाली आहे. फटांगळेला मारहाण करणा-याचे फोटो त्या क्लिपवरून काढण्यात आले आहेत. या क्लिप व फोटोमधील व्यक्तींबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी सीआयडीशी संपर्क  साधावा. त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे आवाहन अक्कानवरू यांनी केली आहे. संपकार्साठी कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे :- पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पथक मध्यवर्ती इमारत, साधु वासवानी रोड, पीडीसीसी बँकेजवळ, पुणे. मोबाइल क्रमांक :- 9049650789 हल्ला केल्याचे आरोपींने केले कबूल यापुर्वी अटक केलेल्या तीन आरोपींनी तपासादरम्यान फाटांगडे यांना मारल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी अहमदनगरमधील एका मंडळाचा टी-शर्ट घातला होता. त्यामुळे त्यांना त्वरीत अटक करणे शक्य झाले, असे अक्कानवरू यांनी सांगितले.  

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPoliceपोलिस