कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाच्या मारेक-यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये तिघांचा समावेश असून पैकी दोन अल्पवयीन आहेत.कोरेगाव भीमा आणि परिसरात झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे (वय ३०, रा. कान्हुरमेसाई, सध्या रा. सणसवाडी) या तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने व्हिडिओ फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, मोबाईल ड्रम डाटा, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास करून अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील तिघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.कोरेगाव भीमा दंगलीत नऊ कोटींचे नुकसानपुणे : कोरेगाव भीमा येथे १ व २ जानेवारी रोजी उद्भवलेल्या दोन गटांतील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसानझाले होते. कोरेगाव भीमा आणि सणसवाडी येथील नुकसानीचेपंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटींच्यावर नुकसान झाले आहे. -वृत्त/२
कोरेगाव भीमा प्रकरण :राहुल फटांगडेच्या मारेक-यांना अटक, तिघांपैकी दोघे अल्पवयीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 6:05 AM