शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

२ वर्षात चंद्रकांत पाटलांची कोरोना आढावा बैठकांना गैरहजेरी; 'अजित पवार मनाचच करतात...', पाटलांचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 7:49 PM

दोन वर्षांत सर्व कोरोना आढावा बैठकीला कोथरूड आमदार गैरहजर

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे :पुणे शहर आणि जिल्ह्यात मार्च 2019 पासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला. शहर, ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) गेले दोन वर्षे काही अपवाद सोडला तर दर शुक्रवारी बैठक घेतात. या बैठकीत बहुतेक सर्व आमदार, खासदार हजर राहून आपल्या मतदारांचे प्रश्न, समस्या बैठकीत उपस्थित करून मार्गी लावतात. परंतु गेल्या दोन वर्षांत कोथरूडचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) एकाही बैठकील उपस्थित राहिले नाही. यामुळे कोथरूडच्या मतदारांचे बैठकीत प्रतिनिधित्व नक्की कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार वाढत गेला तसे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीचे महत्त्व वाढत गेले. दर शुक्रवारी न चुकत होणा-या या कोरोना आढावा बैठकीतमध्येच शहरामध्ये नवीन निर्बंध लागू करणे, जम्बो कोविड हाॅस्पिटल, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविरचे वितरण, रुग्णांना लावण्यात येणारे भरमसाठ बिले आदी सर्व गोष्टीवर लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यामध्ये खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ या भाजपच्या व आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार यांच्यासह अनेक आमदार अनेक महत्वाच्या सुचना करतात, सर्वच आमदार आपल्या मतदारसंघात फिरताना येणा-या अडचणी, काय उपाय योजना राबविल्या पाहिजेत यावर बैठकीत चर्चा करतात.

यामधून अनेक वेळा संपूर्ण शहर, जिल्ह्यासाठी निर्णय घेतले गेले. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षांत कोथरूडचे आमदार म्हणून एकाही कोरोना आढावा बैठकील उपस्थित राहिले नाहीत हे विशेष. राज्याचे गृहमंत्री पदाची जबाबदारी असताना दिलीप वळसे-पाटील,  राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना देखील दोन्ही मंत्री आवर्जुन कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहतात. याशिवाय भाजपचे पुण्यातील इतर सर्व आमदार देखील नियमित उपस्थित असताना, कोथरूडच्या आमदारांची कोरोना आढावा बैठकीला अनुपस्थिती सध्या चर्चाचा विषय ठरला आहे.

बैठकीत कोणतीही भूमिका मांडली तरी अजित पवार त्यांना करायचे तेच करतात, यामुळे बैठकीला उपस्थित राहू वेळ खर्च करण्यापेक्षा मी मतदार संघात लोकांसाठी काय काम करता येईल, याला अधिक प्राधान्य देतो. कोविडसाठी मी लोकांसाठी आवश्यक त्या सर्व उपाय-योजना केल्या. बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून कोणतीही भूमिका मांडली तर त्याचा विचार होत नाही. मी बैठकांना उपस्थित न राहताही मतदार संघात सर्व कामे करतो.- चंद्रकांत पाटील,  आमदार, कोथरूड विधानसभा मतदार संघ

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या