कोथरूड : येथील कै. धोंडीबा सुतार बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही अवस्था झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला. कोठे बाकड्यांचे पत्रे निघाले आहेत, तर कुठे दिवे नाहीत. एवढे मोठे स्टँड आहे; परंतु येथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. एकीकडे जेंडर बजेटची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलांना आवश्यक असणारी सुविधाही द्यायची नाही. ही मानसिकता स्मार्ट सीटीमध्ये बसते का, असा सवाल महिला प्रवाशांनी केला आहे. येथील बाकड्यांचे पत्रे तुटले आहेत. दिव्यांची दुरवस्था झाली आहे. कोथरूड स्टँडची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर स्थापत्य अभियंता निरंजन तुळपुळे यांनी याबाबत सांगितले, की येथील कर्मचाऱ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह प्रवासी वापरू शकतात. मात्र, एकूणच येथील बसस्थानकात अनेक समस्या असून, त्या सोडविण्यासाठी प्रशासनाची मानसिकता दिसत नाही, हे स्पष्ट होत आहे.(वार्ताहर)
कोथरूड स्टॅण्डची दुरवस्था
By admin | Published: January 11, 2017 3:33 AM