ते पुढील काळात गावासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास पिसर्वे ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी व्यक्त केला.
पिसर्वे येथे आज लोकसहभाग व लोकवर्गणीतून गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले, कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा शासकीय यंत्रणेचा निधी न घेता गावकऱ्यांनी गावकऱ्यांसाठी उभारलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. यासाठी गावातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते पुण्यातील उद्योजकांपर्यंत सर्वांनी यथाशक्ती आर्थिक, वस्तू रूपाने, व अन्नसेवेने मदत केली असून. या सेंटरमधून बाहेर जाणारा प्रत्येक रुग्ण हा सशक्त निरोगी नागरिक बनून बाहेर पडणार आहे.
यावेळी पिसर्वेचे सरपंच बाळासाहेब कोलते ,उपसरपंच अरुणा कोलते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कोलते, महेश वाघमारे, बापूराव कोलते, सुनील कोलते, गणेश कोलते, सुखदेव कोलते, नवनाथ कोलते, विठ्ठल कोलते, पोलीस पाटील संभाजी कोलते, भानुदास कोलते, ॲड. शिवाजी कोलते, मच्छिंद्र कोलते, कैलास कोलते, नितीन कोलते उपस्थित होते.
--
कोट
कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा शासकीय यंत्रणेचा निधी न घेता गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्यासाठी उभारलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. यासाठी गावातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते पुण्यातील उद्योजकांपर्यंत सर्वांनी यथाशक्ती आर्थिक, वस्तू रूपाने, व अन्नसेवेने मदत केली आहे.
बाळासाहेब कोलते,
सरपंच
--
फोटो क्रमांक : २९भुलेश्वर कोवीड सेंटर
फोटो ओळ - पिसर्वे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना सरपंच बाळासाहेब कोलते, उपसरपंच अरुणा कोलते व इतर मान्यवर.