नेहमीप्रमाणे गावातील सर्व नागरिकांनी तपासणी करून घेऊन प्रशासनास सहकार्य केले. या मोहिमेअंतर्गत गावातील गावठाण कडूस रस्ता, हायस्कूल. सुकाळे स्थळ. गोटुपती या भागात सकाळी सर्व शिक्षकांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावे अशी माहिती दिली. दिवसभर या प्रत्येक भागात जाऊन शिबीराो नियोजन करून सर्व कुटुंबातील ३२० ग्रामस्थांची कोरोना अँटीजीन तपासणी केली असता ३ नागरीक कोरोना पोसिटीव्ह आढळुन आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, ग्रामसेवक निलेश पांडे आणि ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कदम, वैशाली सुकाळे उपस्थित होते. यावेळी आरोग्य अधिकारी आरती मुळे, दोंदे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री पाटील, आरोग्य सहाय्यक प्रशांत फुगे, आरोग्य सेविका प्रतिभा कारले, आशा सेविका हिरताई बारणे, मदिना शेख, शोभा नीलकंठ, जागृती संजय भागवत, रेश्मा अशोक कडाळे, मुस्कान जाकिर, मोमीन लॅब टेक्निशियन निर्माण पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट राजगुरुनगर केंद्रप्रमुख भीमराव पाटील, मुख्याध्यापक आंबेक, पोखरकर,तिटकारे, तलाठी श्रीम.दिपिका बच्छाव सर्व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
--
फोटो क्रमांक - १६ दोंदे कोवीड तपासणी
सोबत फोटो-- दोन्दे येथे कोवीड तपासणी करताना नर्स