इंदापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात व इंदापूर बस स्थानक तसेच रस्त्यावरील बेघर नागरिकांना शंभू महादेव कावड महोत्सव माळी गल्ली यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. या वेळी क्रांतिज्योती विचारमंचचे पांडुरंग शिंदे, समता सैनिक दलाचे अशोक पोळ, सामजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, शिवभक्त अरुण साळुंखे यांच्या हस्ते रुग्णांना महाप्रसाद देण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके व पांडुरंग शिंदे, अशोक पोळ, प्रकाश पवार यांनी रुग्णांना लवकर बरे होणार म्हणून मानसिक आधार दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम चव्हाण, अतुल शिंदे, अजय बोराटे, विशाल फोंडे, दादा बोराटे, मयूर शिंदे, सचिन शिंदे, शिवदास शिंदे शुभम साळुंखे, शुभम हिंगमिरे, तेजस शिंदे, बालाजी साळुंखे यांनी प्रयत्न केले.
--
चौकट :
नगरपरिषद आरोग्य दूतांना महाप्रसादाचा लाभ
-
इंदापूर नगरपरिषदेच्या जवळपास दीडशेपेक्षा अधिक स्वच्छतादूतांनी इंदापूर शहर अगदी स्वतःच्या घरासारखे स्वच्छ ठेवले आहे. इंदापूर शहरवासीयांना होणाऱ्या अनेक रोगांना यांनी रोखून धरले. त्यामुळे हे स्वच्छतादूत खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत. म्हणून या सर्व स्वच्छता दूतांचे तोंड गोड करण्यासाठी, पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून पॅकिंग करून महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
--
फोटो ओळ : इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना महाप्रसादाचे वाटप करताना पांडुरंग शिंदे व पदाधिकारी.