राज्यात द्राक्ष पिकावरील डाऊनी मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते. त्यामुळे इतर कोणत्याही बुरशीजन्यकांचा वापर न करता बोरडॅक्स मिश्रण हा पर्याय उपयुक्त आहे. तसेच मावावरील नियंत्रणासाठी क्रायसोपली कर्निया, लेडीबर्ड बिटल, गाजरगवत नियंत्रणासाठी झायगोग्रामा बायकॉलोरेटा, गुलाबी बोडअळी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा ब्लॅकबर्नी या उपयोगी कीटकांच्या संवर्धनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिकन्या सई साळुंखे हिला महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. स्नेहल आर. जुकटे, केंद्रप्रमुख प्रा. डॉ. उल्हास बोरले, प्रा. डॉ. आनंद चवई यांचे मार्गदर्शन लाभले.
कराड कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या सई साळुंखे हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
२३०८२०२१-बारामती-०३