राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत झाली होती. यामध्ये माने-पाटील-कचरे गटाने ११ पैकी ७ जागांवर बहुमत मिळविले होते, तर विष्णू मारकड गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर सरपंचपदी कचरे यांची वर्णी लागणार हे निश्चित झाले होते.
येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बगाडे, ग्रामविकास अधिकारी बी. डी. काळे यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. या वेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित ११ सदस्य उपस्थित होते. सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत कृष्णाबाई तात्या कचरे व संगीता विष्णू मारकड यांनी अर्ज दाखल केले होते. तर उपसरपंच पदासाठी मगन गौतम मराडे व आण्णा भारत लावंड यांनी अर्ज दाखल केले. या वेळी सरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये कृष्णाबाई तात्या कचरे यांना ७ मते मिळाली, तर उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडीत मगन गौतम मराडे यांना ७ मते मिळाली. या दोघांची निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली.
या वेळी नवनिर्वाचित सरपंच कृष्णाबाई तात्या कचरे म्हणाल्या, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने तसेच सतिश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास प्राधान्य असेल.
कृष्णाबाई कचरे (सरपंच), मगन मराडे (उपसरपंच) ...............