टाकळीहाजी - कुकडीचे अधिकारी जोपर्यंत अनधिकृत पाईप काढणार नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. गुरुवारी (दि. १४) आमरण उपोषण व उपोषणाची दखल न घेतल्यास शुक्रवारी (दि. १५) आत्मदहन करण्याचा इशारा निघोज (ता. पारनेर) व शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी परिसरातील कुकडी लाभधारक शेतकऱ्यांनी दिला आहे.मंगळवारी कुंड परिसरात निघोज व टाकळीहाजी शेतकºयांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी आमरण उपोषण व आत्मदहन करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकºयांनी अंतिम इशारा दिल्याने कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाच्या अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत. काही करा पहिले पाणी कुंड व होणेवाडी नदीला असे आश्वासन देत हे अधिकारी आंदोलन मागे घेण्यासाठी सतर्क झाले आहेत. कुंड परिसरात झालेल्या बैठकीला पाचशेपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ४४ एसकेएफला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नन्नोर, तसेच कुकडीचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.वळसे-पाटील या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती भाकरेवाडी, माळवाडी, रसाळवाडी, मोरवाडी येथील शेतकºयांनादुपारी उशिरा समजली असली तरी सातशे ते आठशे शेतकरी या ठिकाणी आले होते. या सर्व शेतकºयांनी आम्ही रीतसर पाणीपट्टी देऊन पाणी घेत असून पाणीचोरीचा आरोप करून आमच्यावर अन्याय होत आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही द्याल तो निर्णय आम्ही मान्य करू, अशी विनंती या उपस्थित शेतकºयांनी वळसे-पाटील यांना केली आहे. वळसे पाटील यांनी संबंधित सर्व अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर मा. आमदार गावडे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी गावडे यांना या भागातील सर्व परिस्थितीची माहिती असून या भागातील तसेच निघोज भागातील जनतेशी असणारा त्यांचा संपर्क याकामी उपयोगी पडणार आहे. हा प्रश्न गावडे यांनी सामंजस्याने सोडवण्याची सूचना वळसे-पाटील यांनी गावडे यांना दीली.यावेळी गावडे यांनी संदीप पाटील फाऊंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ व शेतकºयांचे नेते मंगेश वराळ यांच्याशी संपर्क करूनवळसे-पाटील यांच्याशी याबाबत बोलण्याची सूचना केली. मात्र संध्याकाळी शेतकºयांची बैठक होणार असून त्यामधील निर्णयाची माहिती देण्यासाठी आम्ही तुमची बुधवारी भेट घेऊ व चर्चा करू, असे वराळ यांनी त्यांना सांगितले.दरम्यान, मंगळवारी रात्री कुंडावर झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत आमरण उपोषण व आत्मदहन करण्याचे अंतिम नियोजन झाले आहे.वळसे-पाटील यांचा तोडगा काढण्याचा प्रयत्नविधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालून तब्बल चार तास या भागात अधिकाºयांसमवेत फिरून सविस्तर माहिती घेतली. यावेळी हे पाईप अनधिकृत असल्याचे त्यांच्याही लक्षात आले. याकरिता माळवाडी, भाकरेवाडी व वडनेर या परिसरातील शेतकºयांना बंधाºयाच्या माध्यमातून रीतसर पाणी मिळण्यासाठी पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील कुकडी कॅनॉलमधून कायमची व्यवस्था करून हेच पाणी जांबुत (ता. शिरूर) येथील बंधाºयात आणायचे व माळवाडी, भाकरेवाडी या भागातील सर्व शेतकºयांना द्यायचे, हा प्रस्ताव अधिकाºयांशी चर्चा करून संमत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे कुंड, होणेवाडी या परिसरातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.१४४कलम लागूकुकडीचा पाणीप्रश्न पेटला असून, पोलिसांनी निघोज परिसरात १४४ जमावबंदी कलम जारी केल्याने आंदोलन दडपण्यासाठी पोलीसबळाचा वापर होण्याची शक्यता आहे.पोलीस बंदोबस्त मिळताच नळ््या काढणारशेतकºयांना नळ्या काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु शेतकरी आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. बंदोबस्त मिळताच नळ्या काढण्यातयेईल, असे शाखा अभियंता मधुकरदिघे यांनी सांगितले.पाणी सोडाआमचे आंदोलन नळ्या काढण्यासाठी आहे, कुकडीला पाणी सोडून गाडीलगाव बंधारा भरुन द्या असे आंदोलक शेतकरी नेते मंगेश वराळ यांनी सांगितले.
कुकडीतील अनधिकृत उपशावरून संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 2:31 AM