शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कुणबी दाखल्यासाठी मोजावे लागतात २५ हजार

By admin | Published: June 16, 2016 4:22 AM

शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली एवढे कारणही पुरेसे ठरते. एखाद्या दुकानात सेल लागल्यानंतर ग्राहकांची जशी झुंबड उडते.

- संजय माने, पिंपरी

शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली एवढे कारणही पुरेसे ठरते. एखाद्या दुकानात सेल लागल्यानंतर ग्राहकांची जशी झुंबड उडते. तशी झुंबड उडाल्याचे दृश्य प्राधिकरणातील तहसील कार्यालयात बुधवारी पहावयास मिळाले. कोणीही येऊन कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात हात घालून आपापल्या दाखल्यांचा शोध घेत. नागरिकांकडून पैसे उकळणारे एजंट थेट कार्यालयातील कपाटातून कोणतीही फाईल काढून साहेबांपुढे स्वाक्षरीला बिनधास्त ठेवताना दिसले. हा अनागोंदी कारभार लोकमत प्रतिनिधीने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून निदर्शनास आला. शैक्षणिक प्रवेश मिळविण्यापासून ते सवलतीचा लाभ घेण्याकरिता उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, तसेच रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला मिळविण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विविध प्रमाणपत्र सादर करण्याची निकड निर्माण झाली आहे. परिणामी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी वाढ लागली आहे. उत्पन्नाचा दाखला पाहिजे असला, तरी तलाठी दाखल्यापासून प्रक्रिया सुरू होते. तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, आवश्यकतेनुसार करावी लागणारी प्रतिज्ञापत्र या कटकटींना सामोरे जाण्यापेक्षा कोठेही हेलपाटे न मारता काम व्हावे, अशी अपेक्षा बाळगलेले एजंटांचा शोध घेतात. तहसील कार्यालयात कोणी एजंटांची माहिती देत नाही. परंतु त्या आवारात थांबून चौकशी केल्यास महा-ई-सेवा केंद्राचे काही प्रतिनिधी स्वत:च एजंटांचा पर्याय सुचवितात. शहराच्या विविध भागात चालविण्यात येणाऱ्या महा ई-सेवा केंद्रात जमा होणारे विविध दाखल्यांसाठीचे अर्ज एकत्रितपणे तहसीलदार कार्यालयात आणले जातात. तहसील कार्यालयात मंजुरी मिळाल्यानंतर तयार झालेले दाखले महा ई-सेवा केंद्राचे संचालक त्यांच्या केंद्रातून संबंंधित अर्जदारांना वाटप करतात. ही प्रक्रिया अशी होत असली, तरी महा ई-सेवा केंद्र संचालकांना अधिकाधिक अर्जदारांची आवश्यकता भासते. त्यामुळे त्यांच्याकडे दाखल होणारे अर्ज मोठ्या प्रमाणावर एजंटकडून येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महा ई-सेवा केंद्रावर जाऊन थेट अर्ज देणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्याने इतर मागासवर्ग राखीव जागेवर निवडणूक लढण्यासाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कुणबी जातीच्या दाखल्यासाठी २५ हजारांपासून एक लाख रुपये रक्कम मोजावी लागते, अशी माहिती मिळाली आहे. जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महा ई-सेवा केंद्रावर अर्ज दाखल न करता, थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल केले जातात. जातीचा दाखला मिळवून देणाऱ्या एजंटचे मोठे रॅकेट शहरात कार्यरत आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जातात.शासकीय शुल्काच्या तिप्पट खर्चउत्पन्न, जात दाखला, तसेच नॉन क्रिमिलेअर आणि अन्य प्रमाणपत्रासाठी महा ई-सेवा केंद्राने किती शुल्क आकारावे हे शासनाने निश्चित केलेले नाही. किमान ६० रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असताना, २०० ते ७०० रुपये अर्जदाराकडून घेतले जातात. तहसील कार्यालयापासून महा ई-सेवा केंद्राचे अंतर जेवढे दूर तेवढी अधिक रक्कम मागितली जाते. योग्य ती कागदपत्रे सादर केलेली असल्यास उत्पन्न दाखला आठ दिवसांत मिळणे अपेक्षित असते. परंतु एजंटमार्फत गेल्यामुळे अर्जदाराला मुदतीत दाखले मिळत नाहीत. एजंट अव्वाच्या सव्वा रक्कम उकळतात, अशा तक्रारी अर्जदार करीत आहेत. बनावट दाखले देणारे रॅकेटजात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला असो अथवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र पैसे मिळताच काही दिवसांत घरपोच आणून देणारा एजंट दिनकर लिंबाजी म्हस्के (वय ४९, रा. आनंदनगर, चिंचवड) पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रसाद दादाराव बनसोडे (वय ४२) याला उस्मानाबादमधून अटक केली आहे. पोलिसांच्या जाळ्यात दोनजण अडकले. अशीच कामे करणारे आणखी काही एजंट पिंपरी, थेरगाव, काळेवाडी या भागात कार्यरत आहेत. एवढेच नव्हे, तर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचे रबरी शिक्के तयार करणारेसुद्धा कार्यरत असून, त्यांच्यापैकी काहींचे महा ई सेवा केंद्र संचालकांशी लागेबांधे असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे..