कुरुळी : मुऱ्हेवस्तीतीील शेतकरी मारुती मुऱ्हे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी विंधनविहिरी घेतल्या. मात्र, हाती निराश आली. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पाण्याची कमतरता वाढली असल्याने पाण्याची शोध शोध सुरू झाला.शेतीसाठी व पिण्यासाठी मागील महिन्यात विंधनविहीर ३०० फूट खोल घेतली. यामध्ये काम सुरू असताना चांगल्या प्रकारे पाणी लागले; मात्र मोटर बसविल्यानंतर पाणी आले नाही. शेतीला लागणाऱ्या पाण्याची सोय झाली नाही तरी चालेल; मात्र पिण्याच्या पाण्यासाठी शोध सुरू केला. विहिरीसाठी जागा निवडली. कामाला सुरुवात केली. तीस फुटांवर पाण्याचा झुळझुळ वाहणारा झरा मिळाला. आधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्याने ४ दिवसांत ४० फूट विहीर पोकलेनच्या केली. आणखी ५ दिवसांत ६० फूट विहीर खोदणार असल्याचे मुऱ्हे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पाण्याचा दुष्काळ पूर्णपणे थांबणार असल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आंनद खळखळू लागला आहे. विहिरीचे पाणी मुऱ्हेवस्तीत घेऊन जाण्यासाठी पाईपलाईनच्या कामाला सुरुवात केली आहे. विहिरीला लागले पाणी प्रथम पिण्यासाठी वापरून नंतर शिल्लक पाणी शेतीसाठी वापरणार आहे.(वार्ताहर)
कुरुळीत पाण्याचा शोध संपला
By admin | Published: March 22, 2017 3:00 AM