कुरकुंभ, पांढरेवाडी व कुरकुंभ औद्योगीक परिसरातील कोरोना रुग्ण संख्या ही काळजी वाढवणारी नसली, तरी देखील बाहेरील तालुक्यातील येणाऱ्या व्यापारी वर्गाची संख्या जास्त असल्याने व कुरकुंभ बाजाराला ग्राहकांच्या गर्दीची संख्या पाहता याबाबत गांभीर्याने विचार करीत प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामसेवक ताराचंद जगताप यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान या आठवडे बाजारात कुरकुंभ व परिसरातून
येणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे दुपारी तीनच्या नंतर व संध्याकाळी सहा वाजण्याच्या नंतर सुटणारे कामगार बाजारासाठी उशीरापर्यंत येतात व त्यामुळेच हा बाजार रात्री अगदी आठ वाजण्यापर्यंत चालूच राहतो. यावर व्यापारी वर्ग देखील सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे.
--
बंद हा पर्याय नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले असल्याने अनेक शेतकरी, छोटे व्यापारी यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाकडे ग्रामस्थ व व्यापारी दुर्लक्ष करीत असल्याचे आढळत आहे. कुरकुंभच्या मुख्य चौकात पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी बाजाराच्या गर्दीत याबाबत गांभीर्याने घेत नाहीत.त्यामुळे प्रशासनाला नाईलाजास्तव बंदचा निर्णय घ्यावा लागत आहे
- राहुल भोसले,सरपंच कुरकुंभ