औध कुटी रूग्णालय सुरू ठेवावे, याकरिता नगरसेविका सुनिता वाडेकर, स्वीकृत सदस्य वसंतराव जुनवणे यांनी आरोग्य अधिकारी डाॅ. वावरे आरोग्य यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौरभ कुंडलिक, बाबुराव बावधाने, शंकरराव चोंधे, दत्तात्रय होळकर, योगेश सोनवणे उपस्थित होते.
१९६८ सालापासून औंध कुटी रुग्णालय सुरू आहे. औंध बाणेर बालेवाडी औंध रोड कस्तुरबा इंदिरा वसाहत, औंध गावठाण तसेच या परिसरातील सुमारे दोन लाखाहून अधिक नागरिकांच्या लोकवस्तीमध्ये पालिकेेेचा हा एकमेव दवाखाना आहे. सर्वसामान्य गरीब गर्भवती महिलांना मोफत उपचार केले जातात.
कोरोना कालावधी मध्ये अन्य आजारांवर उपचारांसाठी
औंध येथे दवाखाना आवश्यक असताना प्रशासनाने हा दवाखाना बंद केला आहे. यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागणार आहेत.
औंध येथील दवाखाना पुन्हा सुरू करण्यात यावा तसेच या दवाखान्यातील सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान, याविषयी आरोग्य अधिकारी डाॅ . संजीव वावरे यांनी दवाखाना पूर्ववत सुरू ठेवला जाईल, असे सांगितले.