बारामतीकडून इंदापूर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने एक गाडी बैलांसह पुलावरून खाली पडली तर दुसर्या गाडीतील भाऊराव कांबळे हे टेम्पोच्या धक्क्याने उडून टेम्पो च्या चाकाखाली आले व त्यांच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी एकूण अकरा बैलगाड्या रस्त्यावरुन जात होत्या त्यात पहाटेच्या अंधारात बैलगाड्यांचा अंदाज न आल्याने पाठीमागील चार गाड्यांना टेम्पोने धडक दिली अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक टेम्पो घेऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. जखमींना मदत करण्यासाठी कारखान्याचे वतीने मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे, मोटार वाहन प्रमुख गजानन कदम ,रामदास निंबाळकर ,अमरसिंह निंबाळकर सणसर चे माजी उपसरपंच अक्षय काटकर उपस्थीत होते.
टेम्पोच्या धडकेत उसतोड मजुर ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:05 AM