पुणे : सुतारकाम करण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या कठड्यावर थांबलेल्या कामगाराचा बांधकाम साईटवरून पडून जागीच मृत्यू झाला. मुंढव्यातील लोणकर वस्तीमध्ये बुधवारी दुपारी एकच्या सुमारास चालू बांधकाम साईटवर हा प्रकार घडला.खेमचंद हिरालाल कुशवाघ (वय २५) असे मृत कामगाराचे नाव आहे. त्याचा भाऊ रामकरण (वय २८, दोघे रा. विजयनगर, मांजरी) याने याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बांधकाम साईटच्या ठेकेदार आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेमचंद हा बांधकाम साईटवर दुसऱ्या मजल्यावर सुतारकाम करीत होता. त्या वेळी तोल जाऊन तो खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षिततेची बांधकाम साईटवर कोणतीही काळजी ठेकेदाराने घेतली नव्हती. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने साधनसामग्री न पुरवता, हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंढव्यातील लोणकर वस्तीमध्ये बांधकामाच्या साईटवरूनपडून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:26 PM
सुतारकाम करण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या कठड्यावर थांबलेल्या कामगाराचा बांधकाम साईटवरून पडून जागीच मृत्यू झाला. मुंढव्यातील लोणकर वस्तीमध्ये बुधवारी दुपारी एकच्या सुमारास चालू बांधकाम साईटवर हा प्रकार घडला.
ठळक मुद्देबांधकाम साईटच्या ठेकेदार आणि संबंधितांवर गुन्हा दाखलहलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे घडला प्रकार