पुणे : सध्या चीनमध्ये बीएफ. ७ या काेराेनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. काेराेनाचा हा विषाणू तीन वर्षांपूर्वीच्या मूळ काेराेना विषाणूहून वेगळा आहे. यापुढेही असे उपप्रकार किंवा व्हेरिएंट येत राहतील. ते ओळखण्यासाठी राज्यात सात प्रयाेगशाळा आहेत. त्यांपैकी पाच पुण्यात असून, तेथे नवीन व्हेरिएंटचा शाेध घेतला जात आहे.
राज्य आराेग्य विभागाने काेराेना पाॅझिटिव्ह येणाऱ्या सर्वच रुग्णांच्या नमुन्यांचे जिनाेम सिक्वेन्सिंग म्हणजेच जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे ठरवले आहे. राज्यातील सातही प्रयाेगशाळा त्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या प्रयाेगशाळांना ‘इन्साकाॅग नेटवर्क’ असे संबाेधले जाते. यामध्ये पुण्यात बीजे मेडिकल काॅलेज, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), आयसर, एनसीएल, एनसीसीएस या पाच प्रयाेगशाळा आहेत. उरलेल्या दाेन इतर जिल्ह्यांत आहेत.
हे तपासले जाते
- जिनाेम सिक्वेन्सिंगमुळे काेराेना विषाणूचा काेणता प्रकार आहे, हे कळण्यास मदत हाेते.- विषाणूमध्ये काही म्युटेशन म्हणजे बदल झाले आहेत का, ते माणसासाठी किती धाेकादायक आहेत, हे त्याद्वारे कळते.- सुरुवातीला ही सेवा एनआयव्हीमध्ये हाेती. त्यानंतर ती ससून रुग्णालयातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केली. टप्प्याटप्प्याने ती इतर ठिकाणी सुरू करण्यात आली.
विषाणूमधील बदल नाेंदवणार
सध्या राज्यात दीडशे ते दाेनशे रुग्णांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह येत असून, त्या सर्वांचे अहवाल जिनाेम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत. दीड वर्षापूर्वी तर प्रत्येक जिल्ह्यामधील ठरावीक रुग्णांचे अहवाल पाठवले जात हाेते. आता रुग्णसंख्याच कमी झाल्याने जिनाेम सिक्वेन्सिंगचे प्रमाणही कमी झाले आहे. या विषाणूमध्ये काही बदल झाला तर त्या प्रयाेगशाळांचा फायदा हाेणार आहे.
याआधी शाेधला ओमायक्राॅन
शहरातील प्रयाेगशाळांनी आधी ओमायक्राॅनचा बीए.२ व बीए.२.७५ हे काेराेनाचे उपप्रकार शाेधले आहेत. तसेच बीजेच्या प्रयाेगशाळेने डेल्टा व्हेरिएंटचाही शाेध लावला हाेता.
जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यामध्ये पुण्याचे याेगदान माेठे
राज्यात जिनाेम सिक्वेन्सिंगच्या एकूण सात प्रयाेगशाळा आहेत. त्यांपैकी पुण्यात पाच आहेत. म्हणून राज्यातील काेराेना सर्वेक्षण करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यामध्ये पुण्याचे याेगदान माेठे आहे. - डाॅ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जिनाेम सिक्वेन्सिंग