पुणे : सिंधी, मराठी व हिंदी या भाषांचे ज्येष्ठ लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ प्रा. लछमन परसराम हर्दवाणी यांना दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद’ या संस्थेतर्फे ‘साहित्य सन्मान’ तथा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या रविवारी (दि. ७) इंदूर (मध्य प्रदेश) येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कारवितरण होईल.प्रा. हर्दवाणी यांची सिंधी, मराठी व हिंदी या भाषांत आजपर्यंत ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मतानुसार, संस्कृतपासून निघालेल्या सिंधी भाषेची मूळ-स्वाभाविक लिपी देवनागरीच आहे. ब्रिटिश सरकारच्या काळात तिची लिपी अरेबिकमध्ये कृत्रिमरीत्या करण्यात आली होती.(प्रतिनिधी)
लछमन हर्दवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: February 04, 2016 1:39 AM