शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

खाटांची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:10 AM

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुणे शहराला बसला असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेली रुग्णवाढ सलग सुरूच आहे. ...

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुणे शहराला बसला असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेली रुग्णवाढ सलग सुरूच आहे. गंभीर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात खाटा आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.

शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा ४५ हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसा साडेपाच हजार रूग्णांची वाढ होत चालली आहे. फेब्रुवारी महिन्यात १००-२०० ने होणारी वाढ साडेपाच हजार रुग्णांवर गेली आहे. मार्च महिन्यात जवळपास ७० हजार रुग्ण वाढले आहेत. तर, ८ एप्रिलपर्यन्त ३१ हजार रूग्णांची वाढ झाली आहे. त्यातुलनेमध्ये मृत्युदर मात्र दोन टक्क्यांच्या खाली आहे. शहरातील सर्वाधिक रुग्णसंख्या हडपसर, नगररस्ता, सिंहगड रस्ता, वारजे या उपनगरांमध्ये आहे. तर, झोपडपट्टी बहुल भागात नगण्य रुग्ण आहेत. सोसायटी आणि इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

शहरातील खासगी रुग्णालयांमधील खाटा प्रशासनाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डॉ. नायडू रुग्णालय आणि बाणेर कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटा वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. लसीकरणाचा वेग आणि लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

---/---

जानेवारीपासून मार्चपर्यंत दर महिन्याची कोरोनो रुग्णांची संख्या आणि झालेले मृत्यू

महिना। रुग्ण संख्या। मृत्यू। सक्रिय रुग्ण

जानेवारी। ७,१५३। १३४। १९४४

फेब्रुवारी। १६,७८०। ९३। ४,९१९

मार्च। ७०,७४४। ४७८। ३५,८४९

८ एप्रिल पर्यंत। ३१,९२६। २३०। ४६,०७१

--------

१. शहरातील इमारती आणि सोसायट्यांमध्ये वाढला सर्वाधिक संसर्ग, झोपडपट्टी आणि वसाहतींमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहेत. त्यामुळे गृह विलगिकरणात राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

२. शहराच्या हडपसर भागात सर्वाधिक ८०० रुग्ण असून त्याखालोखाल नगर रस्ता (५९६), सिंहगड रस्ता (५३४), वारजे (४७९) आणि कोथरूड (४३५) या उपनगरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

३. सध्या बेड खासगी आणि शासकीय रुग्णालयांकडील ६ हजार ६०० बेड कोविडसाठी राखीव आहेत. विलगीकरणासाठी कोविड सेंटर आणि विलगिकरण

व्यवस्था तयार करा यात आली आहे. नुकतीच दोन हजार खाटांची क्षमता असलेले पाच विलगिकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

- शहरात १६ जानेवारीपासून साडेचार लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा वेग कमी आहे. पालिकेच्या मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.

- सरकारने कडक केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून गांभीर्याने केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी ढिलाई होत असल्याचेही चित्र आहे. विनाकारण फिरणारे नागरिक, थुंकीबहाद्दर आणि विनामास्क फिरणारे नागरिक नियम पाळत नसल्याचे चित्र आहे.

---////---

नागरिकांची स्वॅब चाचणी वाढविण्यात आली आहे. यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला आहे. लसीकरणाचाही वेग वाढविण्यात येत असून केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यासोबतच गंभीर रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयांसोबत बोलणं सुरू आहे. आजमितीस शहरात साडेसहा हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत.

- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

--------

नागरिकांना लस, पुरेशा खाटा आणि औषधे उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. खाटा वाढविण्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनकरिता आम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या संपर्कात आहोत. लॉकडाऊनमध्ये घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करून कोरोना साखळी तोडण्यास प्रशासनास नागरिकांनी मदत करावी.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा ४५ हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसाकाठी साडेपाच हजार रूग्णांची वाढ होत चालली आहे. फेब्रुवारी महिन्यात १००-२०० ने होणारी वाढ साडेपाच हजार रुग्णांवर गेली आहे. मार्च महिन्यात जवळपास ७० हजार रुग्ण वाढले आहेत. तर, ८ एप्रिलपर्यन्त ३१ हजार रूग्णांची वाढ झाली आहे. त्यातुलनेमध्ये मृत्युदर मात्र दोन टक्क्यांच्या खाली आहे. शहरातील सर्वाधिक रुग्णसंख्या हडपसर, नगररस्ता, सिंहगड रस्ता, वारजे या उपनगरांमध्ये आहे. तर, झोपडपट्टी बहुल भागात नगण्य रुग्ण आहेत. सोसायटी आणि इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

शहरातील खासगी रुग्णालयांमधील खाटा प्रशासनाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डॉ. नायडू रुग्णालय आणि बाणेर कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटा वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. लसीकरणाचा वेग आणि लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

---/---

जानेवारीपासून मार्चपर्यंत दर महिन्याची कोरोनो रुग्णांची संख्या आणि झालेले मृत्यू

महिना। रुग्ण संख्या। मृत्यू। सक्रिय रुग्ण

जानेवारी। ७,१५३। १३४। १९४४

फेब्रुवारी। १६,७८०। ९३। ४,९१९

मार्च। ७०,७४४। ४७८। ३५,८४९

८ एप्रिल पर्यंत। ३१,९२६। २३०। ४६,०७१

--------

१. शहरातील इमारती आणि सोसायट्यांमध्ये वाढला सर्वाधिक संसर्ग, झोपडपट्टी आणि वसाहतींमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहेत. त्यामुळे गृह विलगिकरणात राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

२. शहराच्या हडपसर भागात सर्वाधिक ८०० रुग्ण असून त्याखालोखाल नगररस्ता (५९६), सिंहगड रस्ता (५३४), वारजे (४७९) आणि कोथरूड (४३५) या उपनगरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.