नागरिकांनी पुणेवारी पुन्हा झाली सुरु
(अमोल यादव)
बारामती:
बारामती व आसपासच्या तालुक्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी विदेशी मंत्रालयाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रात बारामती सह पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू केले होते. याचा नागरिकांना चांगला फायदा झाला पण काही दिवसांपासून बारामती पासपोर्ट कार्यालय बंद असल्याने नागरिकांना परत वेळ व पैसे खर्च करून पुण्याला हेलपाटे मारावे लागत आहेत.
बारामती शहर विकासाच्या बाबतीत देशात एक आदर्श शहर ठरत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने पोस्ट ऑफिसशी संलग्न पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले बारामती सह आसपासच्या तालुक्यातील नागरिकांना याचा चांगला फायदा झाला मात्र कार्यालयात असणाऱ्या डोंगल बंद आहेत, नेट प्रॉब्लेम आहे, स्टाफ कमी आहे तसेच कोरोना संसर्ग अशा कारणाने कार्यालय बंद आहे. त्यामुळे बारामती सह आसपासच्या दौंड,इंदापुर व पन्नास किलोमीटर अंतरावरील नागरिकांना परत पुणेवारी करावी लागत आहे.
मागील काही दिवसांपासून पासपोर्ट कार्यालय बंद असल्याने आता बारामतीसह पंचक्रोशीतील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आता कोरोना काळात पुण्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. लहान मुले, वयस्कर, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तर वेळ व पैसे खर्च होत आहेत. कार्यालयातील डोंगल बंद आहेत तर येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे डोंगल व पी.एस.पी.आय डी असणे गरजेचे आहे त्याशिवाय येथे काम करता येत नाही या अडचणी आम्ही पोस्ट कार्यालयाला कळवल्या आहेत.
कोरोना काळात कोल्हापुर, सांगली,सातारा इतर ठिकाणची कार्यालय उघडली आहेत मात्र काही अडचणींमुळे बारामती कार्यालय बंद आहे आता पुण्याला कार्यालयात भेटण्यासाठी वेळ लागतो याचा नागरिकांना मनस्ताप होत असून वेळ व पैसे खर्च होत आहेत.
पासपोर्ट कार्यालयातील असुविधांबाबत मला काही माहिती नाही. मला तुमच्याकडून हे समजत आहे. तर तुम्ही त्यांच्याकडूनच माहिती घ्या.
- अमेय निमसोडकर
मुख्य पोस्टमास्तर, बारामती
बारामती येथील बंद असलेले पासपोर्ट कार्यलय
३११२२०२०-बारामती-०२
----------------------------