शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

सुविधांचा अभाव, नवीन बसची घाई, पीएमपीकडून पायाभूत सोयींकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 4:00 AM

प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर ५०० इलेक्ट्रिक बस आणि ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना या बससाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

पुणे - प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर ५०० इलेक्ट्रिक बस आणि ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना या बससाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा, आगार, पार्किंग तसेच इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनची जागा, वर्कशॉपचे सक्षमीकरण, संगणकीकरण, सध्याच्या बसची देखभाल-दुरुस्ती याकडे काणाडोळा केला जात आहे.पीएमपीच्या ताफ्यात सध्या मालकीच्या सुमारे १,१५० आणि भाडेतत्त्वावरील ६५३ अशा सुमारे १,८०० बस आहेत. सध्याची मात्र, त्यापैकी प्रत्यक्षात केवळ १,३०० ते १,४०० बस मार्गावर असतात. सध्याची प्रवासी संख्या आणि पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांची वाढत जाणारी लोकसंख्या यांचा विचार केल्यास पीएमपीला सुमारे ३ हजार बसची गरज आहे. त्याअनुषंगाने मागील काही वर्षांपासून सातत्याने बसखरेदीचा मुद्दा चर्चेला येतो.बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत ५०० ई-बस, ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच यापूर्वीच बसखरेदीसाठी काढण्यात आलेल्या दोन्ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या. एकीकडे बसखरेदीचा निर्णय होत असताना संचालक मंडळाच्या बैठकीत सोयीसुविधा वाढविण्याच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसते.सध्या पीएमपीची ठिकठिकाणी १३ आगार आहेत. दोन्हीशहरांचा पसारा पाहता आगारांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.या आगारांची सध्याची जागाअत्यंत तोकडी आहे. त्यामुळेबस पार्किंगचा मुद्दा सततऐरणीवर येतो. बहुतेक आगारांच्या शेकडो बस रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबतही सातत्याने नाराजी व्यक्त केली.याकडे दुर्लक्ष होत असल्याने मार्गावर ब्रेकडाऊन होणाºयाबसचे प्रमाण वाढत आहे.त्यासाठी वर्कशॉपच्या सक्षमीकरणाची गरज व्यक्त केली जाते. संगणकीकरणामध्येही पीएमपीखूप मागे आहे. मुख्य भांडार वइतर भांडारांमध्ये समन्वयाचाअभाव आहे. त्यामुळे सुट्याभागांचा पुरवठा सुरळीतपणेहोत नाही.चालक-वाहकांची नाराजीचालक, वाहक तसेच इतर कर्मचाºयांनाही पीएमपीकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षांची दुरवस्था झालेली असते. मुख्य बस स्थानकांवर आवश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांमध्येही नाराजी आहे.नवीन बससाठी जागेचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे. जागा निश्चित करण्यात आल्या असून, दोन्ही पालिकांशी याबाबत चर्चा सुरू आहे. आगार, बस स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. इतर सोयीसुविधांबाबत दोन्ही पालिका व पीएमपीमध्ये समन्वय साधला जात आहे. त्याबाबत नियमित बैठका सुरू आहेत.- सिद्धार्थ शिरोळे, संचालक, पीएमपीनवीन बसमधील यंत्रणाही सातत्याने बंद पडतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. केवळ बस खरेदी करून वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी इतर पूरक बाबीही सक्षम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.प्रवासी सुविधांकडे दुर्लक्षपुणे व पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या परिसरात विविध मार्गांवर बस धावतात. बहुतेक मार्गांवरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झालेली आहे. प्रवाशांना ऊन, वारा, पावसापासूून संरक्षण मिळत नाही. काही ठिकाणी थांबे नाहीत. काही मुख्य बस स्थानकांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही, अपुरी बैठकव्यवस्था अशी अवस्था आहे. अनेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. तुटलेल्या खुर्च्या, खिडक्या व उचकटलेले पत्रे, असे चित्र पाहायला मिळते.प्रवाशांच्या अपेक्षा - नवीन बसआवश्यकच, पण...जुन्या बसकडे दुर्लक्ष नकोखिळखिळ्या बस सुधाराव्यातब्रेकडाऊन कमी करावेबस स्थानकांमध्ये सुविधा असाव्यातबसथांबे सुस्थितीत असावेतबस वेळेत याव्यातब्रेकडाऊनची माहिती प्रवाशांना मिळावीपीएमपीच्या ताफ्यात सध्या मालकीच्या सुमारे १,१५० आणि भाडेतत्त्वावरील ६५३ अशा सुमारे १,८०० बस आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ १,३०० ते १,४०० बस मार्गावर असतात.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे