लोकमत न्यूज नेटवर्कवानवडी : पर्यावरणाविषयी लोकांच्या मनात असलेली मानसिकता बदलत चालली आहे. महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी २०१२ पासून विद्युत व गॅसदाहिनीची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. वानवडी येथील नालागार्डन गॅसदाहिनी येथे अंत्यसंस्कार होतात. परंतु येथे सुविधांचा अभाव असल्याने अंत्यविधीसाठी येणारे नागरिक नाराजी व्यक्त करतात. येथील स्वच्छतागृह, शौचालयाची दुरवस्था झाली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना नामफलकाअभावी स्मशानभूमी शोधण्यास अडचण होते.ठिकठिकाणी तुंबलेली गटारे व त्यांच्या दुर्गंधीचा त्रास अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतो. गॅसदाहिनीतून ज्वलन झालेल्या धुराचे शुद्धीकरण करून चिमणीद्वारे हवेत सोडला जातो. परंतु फिल्टर टँक फुटल्यामुळे धूर तसाच हवेत सोडला जातो व पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.आताच्या चार सदस्य प्रभाग पद्धतीमुळे या स्मशानभूमीकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वानवडीतील गॅसदाहिनीत सुविधांचा अभाव
By admin | Published: June 10, 2017 2:17 AM