--
वाघाळे : कोरोनाच्या काळात सगळे उद्योगधंदे अडचणीत आहेत, सरकारकडे निधी कमी आहे मात्र तरी सुध्दा विकासकामे थांबलेली नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांनीसुध्दा या साऱ्या गोष्टींचे जाण ठेवून काटकसरीने काम करावे. मात्र त्यावेळी कामाच्या दर्जाशी तडजोड करू नये असे प्रतिपादन दिलीप वळसे पाटील यांनी केले.
वाघाळे ता. शिरूर येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. पाटील म्हणाले की, गृहमंत्री असल्यामुळे जबाबदारी वाढली असून मतदार संघात कमी वेळ दिला जातो तरी जेष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असून कोणाचेही काम अडणार नाही. पक्षाच्या नेतृत्वाने ज्या ज्या जबाबदारी दिली त्यात उच्च व तंत्र शिक्षण, ऊर्जा, विधानसभा अध्यक्ष, कामगार व उत्पादनशुल्क खात्याला न्याय देत आता गृहखात्याची जबाबदारी जनतेच्या आशीर्वादाने समर्थपणे पेलू असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर साखर कारखाना संचालक प्रदीप वळसे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणशिंग पाचुंदकर, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगा साखर कारखाना उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, संचालक राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, पंचायत समिती माजीसभापती विश्वास कोहकडे, तहसीलदार लैला शेख, उद्योजक सदाशिव पवार, विजय थोरात, सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रय कदम, गावातील सरपंच संगीता थोरात, उपसरपंच अनिता शेळके, सदस्य राजेंद्र धायबर, राजेंद्र भोसले, विकास कारकुड, दादा सोनवणे, नंदा शेळके, पप्पू थोरात, राजु थोरात, आनंदराव शेळके, शामराव शेळके, बाळासाहेब यशवंत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सुहास काटे यांनी केले. आभार धीरज दंडवते यांनी मानले.
--
२८ वाघाळे दिलीप वळसे पाटील
फोटो ओळ : वाघाळे ता. शिरूर येथे विविध विकास निमित्त भूमीपूजनप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.