शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पुणे शहरात गिअरच्या सायकलींचा मोठा तुटवडा ; दोन महिन्यानंतरही ग्राहक 'वेटिंग' वरच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:38 PM

जगात चीननंतर भारतात सायकलींचे जास्त उत्पादन होते. तसेच सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाणही खुप मोठे आहे..

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात व्यायामशाळा बंद असल्याने अनेकांनी सायकलींना प्राधान्य

पुणे : लॉकडाऊन काळात नागरिकांमध्ये व्यायामाचे महत्व वाढू लागल्यानंतर सायकलींच्या मागणीतही काहीशी वाढ झाली. पण सध्या उत्पादन कमी होत असल्याने पुण्यात गिअरच्या सायकलींचा तुटवडा जाणवत आहे. कंपन्यांकडे मागणी करून दोन महिने झाले तरी सायकली मिळत नाहीत. प्रामुख्याने चीनमधून सायकली व सुट्टे भाग येत असल्याने त्यावर परिणाम झाल्याचे सायकल विक्रेत्यांनी सांगितले.

जगात चीननंतर भारतात सायकलींचे जास्त उत्पादन होते. तसेच सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाणही खुप मोठे आहे. लॉकडाऊनमध्ये त्यावर विपरीत परिणाम झाला. पण या कालावधीत व्यायामशाळा बंद असल्याने अनेकांनी सायकलींना प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी शारीरिक क्षमता वाढविणे गरजेचे असल्याने लोकांमध्ये व्यायामाचे महत्व वाढले असून त्याचा परिणाम सायकलींच्या मागणीवरही झाला आहे. पण विक्रेत्यांना कंपन्यांकडून पुरेशा सायकली मिळत नसल्याची स्थिती आहे.

पुण्यामध्ये प्रामुख्याने गिअर असलेल्या सायकलींचा तुटवडा जाणवत आहे. उत्पादक कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. तसेच चीनमधून येणाºया मालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने विक्रेत्यांना सायकली वेळेत भेटत नाहीत. काही विक्रेत्यांनी एक-दोन महिन्यांपासून मागणी करूनही सायकली मिळालेल्या नाहीत. लॉकडाऊनपुर्वी दररोज सर्वप्रकारच्या १०० ते १२५ सायकलींची विक्री होत होती. हा आकडा सध्या ५० ते ६० च्या घरात आहे. अनेक विक्रेत्यांना मागणीप्रमाणे सायकली मिळत नसल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.---------------माझ्याकडे सध्या ३० ते ४० ग्राहकांची गिअर सायकलींची मागणी आहे. पण मागील एक-दोन महिन्यांत एकही सायकल मिळालेली नाही. प्रामुख्याने चीनमधून येणारे सुट्टे भाग कमी झाले आहेत. मनुष्यबळही पुरसे नाही. कच्च्या मालाच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिणामी उत्पादान ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसते.- बाबा कुलकर्णी, अध्यक्ष, पुणे सायकल डिलर्स असोसिएशन------------पुणे शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. पण मागील काही वर्षांत हे शहर दुचाकींचे झाले आहे. सायकलींना मागणी होती त्यावेळी डिलर्स असोसिएशनचे सुमारे ५ हजार सदस्य होते. आता हा आकडा  ५० ते ६० पर्यंत खाली आला आहे. पुण्याचा पसाराही खुप वाढल्याने सायकलने प्रवास करणे शक्य होत नाही. गिअर सायकलींचा वापर व्यायामासाठी वाढत आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.----------------लॉकडाऊननंतर व्यायामासाठी गिअर सायकलींना मागणी वाढली आहे. प्रामुख्याने २४ व २६ इंची सायकलींची मागणी आहे. पण उत्पादन कमी असल्याने लवकर मिळत नाहीत.- अमित मेहता, पुना सायकल मार्ट

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन