- राजानंद मोरे- पुणे : ‘फास्टॅग’मध्ये बसविण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक ‘चीप’ परदेशातून आयात केली जात असून सध्या या चीपची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे देशभरात फास्टॅगचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (एनएचएआय) कडून होत असलेल्या फास्टॅग वितरणातही अडचणी असल्याने काही अधिकृत विक्रेत्यांना एक महिना होऊनही फास्टॅग उपलब्ध होऊ शकले नाहीत.देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्ग तसेच राज्यातील काही महामार्गांवर फास्टॅगद्वारे टोलचे पैसे घेतले जात आहेत. सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दि. १ डिसेंबरापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला होता. पण त्याच्या उपलब्धदेअभावी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला. पुन्हा हीच समस्या उदभवल्याने पुढील ३० दिवसांसाठी मुदत वाढवावी लागली. केंद्र सरकारकडून फास्टॅग उपलब्ध होत नसल्याने मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये वितरणातील त्रुटींसह फास्टॅगचे उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे. मागील काही दिवसांत फास्टॅगची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने तुटवडा भासत आहे. देशात फास्टॅग तयार करणाºया काही मोजक्याच कंपन्या आहेत. त्यापैकी एक असलेली एम टेक इनोव्हेशन ही कंपनी हिंजवडी येथे आहे.या कंपनीतील अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘फास्टॅगमधील चीप आपल्या हाताच्या नखाच्या केवळ १० टक्के एवढ्या आकाराची असते. ही चीप परदेशातील केवळ दोन कंपन्यांकडून तयार केली जाते. ही ‘चीप’ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग मध्ये बसविली जाते. या टॅगलाच फास्टॅग म्हणतात. ‘चीप’मध्ये वाहनाशी संबंधित सर्व माहिती तसेच बँकेची माहिती, टोल भरल्याची माहिती साठवून ठेवली जाते. त्यामुळे ही चीप महत्वाची असते. पण सध्या परदेशातून या चीपची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे टॅगच्या उत्पादनावर परिणाम होत असून ग्राहकांची मागणी पुर्ण होत नाही. मागील काही दिवसांत ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत दररोज सुमारे २० ते ३० हजार फास्टॅगचे उत्पादन होत होते. कंपनीकडून भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनीसह काही बँका तसेच मागणीनुसार फास्टॅग उपलब्ध करून दिले जातात. पण या कंपनीने जानेवारी महिन्यातच चीप उपलब्ध होतील असे सांगितले आहे. त्यामुळे फास्टॅगचे उत्पादन ठप्प झाले आहे.’ -----------स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अधिकृत फास्टॅग विक्रेत्यांनीही फास्टॅग उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. ‘फास्टॅग सुरू होण्याची मुदत ६० दिवसांची असते. मागील महिन्यापर्यंत मागणी अभावी ही मुदत संपण्याआधी ‘एनएचएआय’ला टॅग परत करावे लागत होते. पण आता २० दिवसांपुर्वी आॅर्डर देऊनही फास्टॅग मिळत नाहीत. सध्या जवळपास १५० जणांनी टॅगची मागणी केली आहे. पण टॅग कधी मिळणार हे सांगु शकत नाही.’ प्रकाश रोडके हेही मागील दीड वर्षांपासून फास्टॅगची विक्री करतात. पण त्यांनी मागील १६ दिवसांपुर्वी नोंदणी करूनही केंद्राकडून फास्टॅग मिळालेले नाहीत. धनकवडी येथील दत्ता निगडे यांनाही हाच अनुभव येत आहे. त्यांनी एक महिन्यापुर्वी ‘एनएचएआय’कडे टॅगची आॅर्डर दिली असून अद्याप मिळालेले नाहीत.पुण्यातील बँक आॅफ बडोदामधील एका अधिकाºयाने सांगितले की, हिंजवडी येथील कंपनीकडे सुमारे २ लाख फास्टॅगची मागणी केली आहे. पण आतापर्यंत केवळ ५० ते ६० हजार टॅग मिळाले आहेत. परदेशातील मिळणारी चीप उपलब्ध होत नसल्याने फास्टॅगची निर्मिती ठप्प झाल्याचे कारण दिले जात आहे.
देशभरात फास्टॅगमधील ‘चीप’चा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:30 PM
सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दि. १ डिसेंबरापासून फास्टॅग बंधनकारक
ठळक मुद्देअधिकृत विक्रेत्यांना एक महिना होऊनही फास्टॅग होऊ शकले नाहीत उपलब्ध