शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

पर्यावरणाबाबत सकारात्मकतेचा अभाव

By admin | Published: January 02, 2017 2:32 AM

आपण दररोज प्रदूषणामध्ये भर घालत आहोत. या प्रदूषणाचे चटके पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत.

पुणे : ‘आपण दररोज प्रदूषणामध्ये भर घालत आहोत. या प्रदूषणाचे चटके पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. परंतु, त्याचा आपण गांभीर्याने विचार करत नाही. विचार योग्य नसल्याने आपल्याकडून त्या प्रकारची सकारात्मक कृती होत नाही आणि निसर्गाचा ऱ्हास सुरूच आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. डॉ. श्री. द. महाजन यांच्या ‘निसर्गभान’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अवचट यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र शेंडे, पराग महाजन, नंदू कुलकर्णी उपस्थित होते. अवचट म्हणाले, ‘‘बदलत्या सामाजिक आणि औद्योगिकरणामुळे निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. आपण केवळ वायू, जल आणि ध्वनी या प्रदूषणांवरच लक्ष केंद्रित करीत आहोत. या सर्वांच्या मुळाशी मानवाच्या वैचारिकतेमध्ये झालेले प्रदूषण कारणीभूत आहे.’’ केतकी घाटे यांनी सूत्रसंचालन केले. नंदू कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. दीप्ती सिधये आणि डॉ. श्री. द. महाजन यांनी या वेळी निसर्ग कविता सादरीकरण केले. डॉ. स्वाती गोळे, प्रकाश गोळे, विवेक महाजन, डॉ. पराग महाजन, पराग साळसकर, आनंद लोखंडे, स्वानंद देशपांडे, डॉ. रमेश गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)