शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

लाड यांना ४८ हजार ८२४ मतांचे मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:15 AM

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत दहा वीस नव्हे, तर तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते़ यातील प्रमुख लढत ...

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत दहा वीस नव्हे, तर तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते़ यातील प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे अरूण लाड व भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख यांच्यामध्येच होती़ मात्र ही लढतही एकतर्फी झाल्याचे दिसून आले असून, लाड यांना देशमुख यांच्यापेक्षा पहिल्याच पसंती क्रमांकांच्या मतमोजणीत तब्बल ४८ हजार ८२४ मते मिळाली आहेत़

पदवीधर मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिया गुरूवारी सकाळी सुरू झाल्यावर प्रारंभी टपाली मते व सर्व जिल्ह्यातील मते एकत्र करण्यात आली़ यानंतर २ लाख ४७ हजार ५० मतपत्रिका ११२ टेबलवर मोजणीसाठी वितरित करण्यात आल्या़ यावेळी प्रथम वैध व अवैध मतपत्रिका निवडण्यात आल्या़ यामध्ये २ लाख २८ हजार २७२ मते वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास १ लाख १४ हजार १३७ हा विजयी कोटा ठरविण्यात आला. शुक्रवारी (४ डिसेंबर) पहाटेपर्यंत हे काम सुरू होते़ दरम्यान याच प्रक्रियेत लाड यांना मिळालेली मते पाहता त्यांचा विजय हा निश्चित मानला गेला़

लाड यांना पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीतच निश्चित कोट्यापैकी अधिकची ८ हजार ८ मते अधिक मिळाली़ यामुळे दुसºया पसंती क्रमांकाची मते मोजण्याची (''''''''एलेमिनेशन'''''''') आवश्यकताच पडली नाही़ लाड यांच्या नंतर सर्वाधिक मतेही भाजपचे संग्राम देशमुख यांना पडली असून ती ७३ हजार ३२१ इतकी आहेत़ तर त्या खालोखाल मनसेच्या उमेदवार अ‍ॅड़रूपाली ठोंबरे पाटील यांना ६ हजार ७१३ मते पडली आहेत़ तर संभाजी ब्रिगेडचे डॉ़ श्रीमंत कोकाटे यांना ६ हजार ५७२ मते मिळाली आहेत़

--------------------

६२ पैकी सर्वाधिक मते मिळविणारे पहिले दहा उमेदवार

अरूण गणपती लाड (महाविकास आघाडी) :- १,२२,१४५

संग्राम देशमुख (भारतीय जनता पक्ष) :- ७३ हजार ३२१

अ‍ॅड़ रूपाली पाटील ठोंबरे (मनसे) :- ६ हजार ७१३

डॉ़ श्रीमंत कोकाटे (अपक्ष) :- ६ हजार ५७२

प्रा़ शरद पाटील (जनता दल सेक्युलर) :- ४ हजार २५९

सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) :- ३ हजार १३९

अरूण (अण्णा) लाड (अपक्ष) :- २ हजार ५५४

डॉ़ अमोल पवार (आम आदमी पार्टी) :- १ हजार १२१

धनंजय घोंडकर (अपक्ष) :- ९८९

कृपाल पळूसकर (संभाजी ब्रिगेड) :- ८४३

---------------------------