शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 2:20 PM

काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे..

ठळक मुद्दे युवक क्रांतिवीर पुरस्काराचे वितरणआम्ही लडाखवासीय भारताचाच भाग भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्ध लडाखच्या भूमीवरून लढले गेलेसीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय

पुणे : मुंबई-दिल्लीमध्ये पर्यटनला आले असता आमच्या चेहरापट्टीवरून तुम्ही चिनी, नेपाळी आहात का? असा प्रश्न आमच्याच भारतीय बंधूंकडून विचारला जातो. आम्ही लडाखवासीय भारताचाच भाग असून, आम्ही आमच्या बांधवांच्या परिचयाचे नाहीत, या जाणिवेने मनाला यातना होतात. भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्धलडाखच्या भूमीवरून लढले गेले. त्यामुळे ‘युद्धभूमी’ अशीदेखील एक ओळख तिला प्राप्त झाली आहे. परंतु लडाखची ओळख युद्धभूमी नव्हे, तर बुद्धभूमी अशी व्हावी, अशी इच्छा लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केली.श्री पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकॅडमी, पूर्णवाद युवा फोरम आणि जीवन कला मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा ‘युवक क्रांतिवीर’ पुरस्कार लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना अ‍ॅड. विद्यासागर, डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ त्या वेळी नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्र फिरोदिया होते. या वेळी व्यासपीठावर अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल संत, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया, एस.एन.बी.पी. शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. दशरथ भोसले, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉ. पी. डी. पाटील, पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, अ‍ॅड. गणेश पारनेरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर आणि सचिन इटकर उपस्थित होते.या वेळी जीवनकला मंडळातर्फे दर वर्षी दिला जाणारा ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. सुभाषचंद्र प्रतापराव भोसले यांना, तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त आणि सती मनकर्णिका माता पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिला जाणारा मातृधर्म पुरस्कार मंगला चंद्रशेखर इटकर यांना प्रदान करण्यात आला..........

गेल्या ७० वर्षांपासून आमचे भारतीय आस्तित्व नव्हते. ३७० कलमाद्वारे मोदीसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला ओळख मिळाली. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे. सीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय आहे. ‘सवाल करो, बवांल मत करो’ या मताचा मी आहे. प्रश्न विचारणे हे जिवंत लोकशाहीचे द्योतक आहे. शिस्त, समाधी आणि ज्ञान या त्रिसूत्रींवरच भारत प्रगती करू शकेल. कोणत्याही विचारधारेची ही त्रिसूत्री हा पाया पाहिजे. कोणत्याही घटनेचे विश्लेषण होऊन सामाजिक माध्यम फॉलो झाले पाहिजे. जाम्यांग त्सेरिंग नामग्याल, खासदार

टॅग्स :Puneपुणेladakhलडाखwarयुद्धIndian Armyभारतीय जवानBJPभाजपा