शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

'लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही', शरद पवारांचा युतीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 1:56 PM

राज्यात महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहिण योजनेला हरकत नाही, परंतु सध्या वस्तुस्थिती वेगळी आहे

पुणे: राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण सध्याच्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही.

देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे पण आजचे राज्यकर्ते त्याबाबत काहीच करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते .  

नेमक काय म्हणाले,'शरद पवार'

लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला ४०० खासदार निवडून द्या असे सांगत होते. कारण त्यांना  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्य घटना बदलायची होती. देशातील आमच्या सवे घटक पक्षांनी एकत्रित लोकसभा निवडणूक लढविली. महाराष्ट्र ४८ खासदारापैकी ३oखासदार महाविकास आघाडीचे आले. त्यामुळे भाजप घटक पक्ष ४००चा आकडा गाठू शकले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेला धन्यवाद दिले पाहिजे.

दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार

राज्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. त्याला हरकत नाही . महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पण राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत.याचाच अर्थ दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर मध्ये 13 हजार महिला गायब आहेत. असेही शरद पवार यांनी सांगितले

राज्यात 20 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही वाढल्या आहेत. शेतीमालाला किंमत मिळत नाही बी बियाणे खते यांच्या किमती वाढल्या आहेत .  त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बँके वाले जप्ती करतात त्यामुळे बेइज्जतीहोते त्याचा परिणाम आत्महत्यांमध्ये होत आहे . राज्यात 20 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत गेल्या सहा महिन्यात १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत मे महिन्यात 206 तर जून महिन्यात 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे असे शरद पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्याला पुन्हा एक क्रमांकाचे राज्य बनवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी