पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक झाली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लहू शेलार, तर काँग्रेसचे रोहन बाठे यांनी उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरले होते.हातवर करून
झालेल्या मतदानात लहू शेलार यांना ४, तर रोहन बाठे यांना २ मते मिळाली आणी २ मतांनी लहू शेलार विजयी झाले.
निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी काम पहिले.
.आज उमेदवारी अर्जावर लहूनाना शेलार यांना मंगल बोडके यांनी सूचक म्हणून सही केली आणी राष्ट्रवादीचे सदस्य श्रीधर किंद्रे,दमयंती जाधव,मंगल बोडके व लहू शेलार अशी चार मते लहू शेलार यांना मतदान केले आणी शेलार विजयी झाले .तर काँग्रेसचे सदस्य रोहन बाठे यांना शिवसेनेच्या पूनम पांगारे सूचक झाल्या होत्या.राष्ट्रवादीची दोन मते बाठे यांना न मिळाल्याने त्यांचा उपसभापती निवडणुकीत पराभव झाला.
दमयंती जाधव पंचायत समितीच्या उपसभापती होत्या त्या सभापती झाल्याने उपसभापतिपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता.त्यामुळे नवीन उपसभापतिपदाची निवडणूक लागली होती. या पदासाठी वेळू गणातील शिवसेना सदस्या पूनम पांगारे व भोंगवली गणातील काँग्रेसचे सदस्य रोहन बाठे दोनजण इच्छुक होते.तर राष्ट्रवादीकडुन लहु शेलार यांना उमेदवारी दिली होती.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष
संतोष घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना लहू शेलार यांना मतदान करावे म्हणून व्हिप बजावले होते.त्यामुळे राष्ट्रवादीच्या
सदस्यांनी सभापतिपदाच्या वेळी केलेली चूक उपसभापतिपदाच्या निवडणुकीवेळी न करता पक्षादेशाचे पालन करून लहू शेलार यांना उपसभापतिपदासाठी मतदान केले.यामुळे सभापतिपदा वेळी झालेला महाआघाडीचा प्रयोग यावेळी यशस्वी झालेला नाही
भोर पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळातील लोकांची कामे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे असल्याचे नवनिर्वाचित उपसभापती लहू शेलार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
उपसभापती निवडीनंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी लहू शेलार यांचा सत्कार केला. यावेळी लहू शिंदे,सुहित जाधव,मनोज खोपडे उपस्थित होते.
भोर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी लहू शेलार यांना प्रमाणात देताना उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्यासह इतर सदस्य फोटो