पुणे: जेजुरी येथील कपड्यांचे दुकान लुटुन त्यातून अडीच लाखांचे कपडे चोरुन नेणाऱ्या दोन भावांना ग्रामीण पोलिसांनी वाघोली येथे अटक केली आहे. एप्रिल महिन्यात ही चोरीची घटना घडली होती. या चोरट्यांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेशकुमार खेतारामजी माळी वय ३६ आणि विक्रमकुमार खेतारामजी माळी (वय ३४ दोघे रा. मेडोग्रीन,डोंबिवली ईस्ट, मुंबई मूळ रा.फालना ता.बाली जि.राजस्थान) यांना वाघोली येथून शेवरलेट बीट कारसह ताब्यात घेण्यात आले. या कारमध्ये १४ पिशव्यांत नवीन कपडे मिळून आले. त्याबाबत चौकशी केली असता दोघांनी मिळून जेजूरी व कुंजीरवाडी येथील कपडयाचे दुकान फोडून चोरी केलेले कपडे असल्याचे सांगितले.२४ एप्रिल रोजी जेजूरी शिवानंद हॉटेल समोरील आर.एन.गारमेंटस या कपडयाचे दुकानाचे शटर अज्ञात चोरटयांनी उचकटून त्यामधून जीन पँट व शर्ट असा किं.रु.२,५२,२००/- चा माल चोरुन नेला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जेजूरी व लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेले किमतीचे २,०७,०००/- चे कपडे जप्त केले आहेत. आरोपींकडे सखोल चौकशी करता त्यांनी या व्यतिरिक्त खालील ८ गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस पो.कोठडी दिली आहे.
लाखो रुपयांचे कपडे चोरणारे भाऊ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:16 PM
२४ एप्रिल रोजी जेजूरी शिवानंद हॉटेल समोरील आर.एन.गारमेंटस या कपडयाचे दुकानाचे शटर अज्ञात चोरटयांनी उचकटून त्यामधून जीन पँट व शर्ट असा किं.रु.२,५२,२००/- चा माल चोरुन नेला होता.
ठळक मुद्दे अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जेजूरी व लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल