शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

स्कूल बसचालकांना लाखाचा दंड

By admin | Published: December 22, 2016 2:47 AM

विद्यार्थी वाहतूक नियमांंचे पालन न करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा

पुणे : विद्यार्थी वाहतूक नियमांंचे पालन न करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उभारला असून, बुधवारी जप्त केलेल्या ६० वाहनांपैकी १८ वाहनांकडून १ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आरटीओने मंगळवारी १३२ वाहनांची तपासणी केली होती. त्यात ७७ वाहने दोषी आढळली होती. त्यातील ६० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या वाहनांपैकी १८ वाहनचालकांनी तातडीने आरटीओने आकारलेला दंड, कर व व्यवसाय कराचा भरणा केला. यात दंड स्वरूपात १ लाख ५ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कर स्वरूपात ४ हजार ६०७, तर व्यवसाय कराच्या स्वरूपात ५ हजार २८५ रुपयांचा भरणा करून घेतला. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी राज्य सरकारकडून विद्यार्थी वाहतूक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार दरवर्षी स्कूल बसचे पासिंग करून घेणे, बसला विशिष्ट रंग देणे, फायर बॉक्स, प्रथमोपचार पेटी बसविणे, चालकाकडे वाहन परवाना असणे, बसच्या पायऱ्यांचा आकार, वाहन योग्यता प्रमाणपत्र अशा विविध अटी घालून दिल्या आहेत. मात्र, या नियमावलीकडे स्कूल बसचालक दुर्लक्ष करीत आहेत. विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन योग्य आहे की नाही, याची शहानिशा करीत नाहीत. कोणताही पालक मुलांना बसमध्ये बसविताना बसची पाहणी करीत नाही. त्यामुळे बसचालकही नियमांची पायमल्ली करीत आहे. प्रत्येक पालकाने स्कूल बस, व्हॅनची पाहणी करणे गरजेचे आहे. मुलांना सुरक्षितपणे शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांनी जबाबदारी उचलायला हवी, तरच विद्यार्थी वाहतूकदारांवर अंकुश ठेवता येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत म्हणाले.