पुणो : लक्ष्मी रस्त्यावर तीन वर्षापूर्वी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून पादचा:यांसाठी राबविण्यात आलेल्या वॉकिंग प्लाझाचा बोजवारा उडला असतानाच, याच रस्त्यावर पुन्हा आठवडय़ातून एकदा नो व्हेईकल झोन दिवस राबविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक (सिटी पोस्ट) ते टिळक पुतळा चौक या मार्गावर ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला असून, मुख्य सभेच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे उपमहापौर आबा बागूल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर नो व्हेईकल झोन राबविण्याचा प्रस्ताव बागूल यांनी दिला होता. या प्रस्तावास पोलिसांनी, तसेच पीएमपीनेही ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, हा प्रस्ताव मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
या योजना यशस्वी झाल्यानंतर शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही योजना राबविणो शक्य असल्याचेही प्रशासनाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेस अधिकार
या संकल्पनेबाबत महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांचा अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानुसार, पालिकेनेच या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी, असा अभिप्राय कळविण्यात आला आहे. तर महाराष्ट्र महापालिका अधिनियम 2क्8 नुसार, सार्वजनिक रस्त्याचा उपयोग करण्यास मनाई करण्याचा अधिकार मुख्य सभेस आहे. त्यामुळे मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, ही योजना राबविण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, स्थानिक दुकानदार, तसेच स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करण्यात येणार असून, पीएमपी तसेच इतर वाहतूक पर्यायी रस्त्यांनी वळविण्यात येणार आहे.
वॉकिंग प्लाझाचा फज्ज..
या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने तीन वर्षापूर्वी याच रस्त्यावर बेलबाग चौक ते टिळक चौक या मार्गावर वॉकिंग प्लाझा सुरू केला आहे. त्यासाठी कॅम्पाकडे जाताना, रस्त्याच्या डाव्या बाजूस पार्किग, तर उजव्या बाजूस पादचा:यांना चालण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. मात्र, या योजनेचा चांगलाच फज्ज उडाला आहे. रस्त्यावर चारचाकी पार्किगला मनाई असताना, दुकानासमोरच पार्किग होते. तर, चालण्यासाठीच्या जागेत पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होत असून, त्याचा भार इतर रस्त्यांवर येत आहे.