शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

ललित पाटील ताब्यात असताना नीट सांभाळता आले नाही, आता...! न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सुनावले

By नम्रता फडणीस | Published: October 11, 2023 7:07 PM

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती

पुणे : इतके दिवस ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आले नाही आणि आता भूषण व अभिषेक या आरोपींसाठी पोलिस कोठडी मागताय? त्यांच्याकडे काय तपास करणार? पोलिस खाते पणाला लागल्यामुळे पोलिस कोठडी मागताय का? अशा शब्दांत न्यायालयाने तपास अधिका-यांना सुनावले. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलिस कोठडी दिली तर जेव्हा मुख्य आरोपी ललित पाटील सापडेल तेव्हा दोघांना पुन्हा पोलिस कोठडी मिळणार नाही. नवीन कायदा आलाय माहितीये ना? एकाच वेळी चौदा दिवसांची पोलिस कोठडी घेणे योग्य होणार नाही असे सांगत न्यायालयाने दोघा आरोपींना चौदा दिवसांची पोलिस कोठडी न देता दि. 16 आँक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

 ससून ड्रग रँकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मेफेड्राँन बनविणारा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि.10) नेपाळ बाँर्डरवर पकडले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटील पळून गेल्याने मागील काही दिवसांपासून पोलीस खात्यावर आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

त्यावरुन पोलिस खाते पणाला लागल्यामुळे पोलिस कोठडी मागताय का? असा सवालही न्यायाधीशांनी केला. यावेळी न्यायालयाने भूषण आणि अभिषेक या दोघांना  तुमचे वकील कोण? अशी विचारणा केली. त्यावर आम्हाला वकील दिलेले नाहीत असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले. न्यायालयात हजर असलेल्या वकिलांना तुमच्यापैकी कोणी या दोन आरोपींचे वकीलपत्र घेण्यास तयार आहे का? असे विचारले. त्यानंतर न्यायालयात उपस्थित एक वकील आरोपींचे वकीलपत्र घ्यायला तयार झाला. न्यायालयाने थोडा वेळ कामकाज थांबविले आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दोघांच्या वतीने रितसर अर्ज करण्यास न्यायालयाने वेळ दिला. त्यानंतर विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने  अँड यशपाल पुरोहित आणि चैतन्य दीक्षित यांनी दोघांचे वकीलपत्र न्यायालयात सादर केले. त्याप्रमाणे आरोपींच्या बाजूने अँड पुरोहित यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

एखादे सलून काढायचे म्हटले तरी पोलिसांना कळते

ललित पाटील पोलिसांच्या नजरकैदेतून पसार झाला, त्यामुळे पोलिसांची सर्वत्र नाचक्की झाली आहे, या पार्श्वभूमीवर एखादे सलून काढायचे म्हटले तरी पोलिसांना कळते. पण ललित पाटील पसार झालेला पोलिसांना कळत नाही अशी टिप्पणीही न्यायाधीशांनी केली.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय