लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची ससून रुग्णालयाची वारी अजूनही थांबलेली नाही. अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससूनमध्ये आणले हाेते. त्यानंतर त्याला पुन्हा १९ नाेव्हेंबरलाही तातडीच्या विभागात तपासणीसाठी आणले हाेते. मात्र, डाॅक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करून त्याला ॲडमिट न करता तत्काळ पुन्हा पाठवून दिले.
ललितवर याआधी ‘पंचतारांकित’ उपचार झाल्यावर त्याचे ड्रग्जतस्करी प्रकरण उघडकीस आले. यानंतर ताे पळूनही गेला. या प्रकरणी प्रचंड टीका झाल्यानंतर ससून रुग्णालयानेही कानाला खडा लावला आहे.
कैदी वाॅर्ड हलविण्यास वेग सध्याच्या १६ क्रमांकाच्या कैदी वाॅर्डमधील सुविधांवरूनही ससूनवर टीका झाली हाेती. त्यामुळे आता हा वाॅर्डदेखील बंद करून कैदी वाॅर्ड दुसरीकडे शाेधला जात आहे. वाॅर्ड क्रमांक १३ आणि १८ या दाेन वाॅर्डांमधील एक भाग कैदी वाॅर्डमध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. हा भाग काॅलेज काउन्सिलमध्ये मांडण्यात येईल आणि परवानगी मिळाल्यास कैदी वाॅर्ड हलवण्यात येईल, अशी माहिती ससूनमधील एका अधिकाऱ्याने दिली.