याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, क्षीरसागर हे आई आजारी असल्याने २२ जूनपासून पातूर (जि. अकोला) येथे गावी गेले होते. घरी कोणीही नव्हते, दि. ३० जूनला त्यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या प्रीतम जाधव यांनी क्षीरसागर यांना घराचे कुलूप तुटल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. त्यानतंर क्षीरसागर हे गुरुवारी घरी आले असता त्यांना कपाट उघडलेले व सामान अस्ताव्यस्त पडलेले निदर्शनास आले. घरातील सामानाची तपासणी केली असता त्यात तीन तोळे सोन्याचे मोहनमाळ किंमत एक लाख वीस हजार रुपये, चांदीची नाणी, रोख पाच हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. तर क्षीरसागर यांच्या घराशेजारी राहणारे दीपक जिजाबा पाटील घर क्रमांक ७४ यांच्या घरीही चोरी झाली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एच. एस. पडळकर करीत आहे.