याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयुर बाळासाहेब लोणकर ( वय २१ रा. गदादेवस्ती, सुपे ) हे शुक्रवारी दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी दुकानात आल्यावर त्यांना दुकानांचे शटर उटकल्याचे दिसले.त्यांनी दुकाना प्रवेश केला तेंव्हा दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते. दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, एलईडी टिव्ही, पेनड्रायव्ह, चांदीचे शिक्के, मेमरीकार्ड असा सुमारे ६ लाख तर ३ लाख ७० हजाराच्या रोख रकमेसह एकुण ९ लाख २६ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला असल्याचे उघडकीस आले.
दरम्यान येथील सपोनी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शेलार, सहाय्यक फौजदार डी. एस. जाधव, पोलिस कॉंस्टेबल के. व्ही. ताडगे, विशाल नगरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
--
सीसीटीव्हीत चोरट्यांचे चित्रण कैद
--
शॉपीच्या सीसीटीव्ही फूटेजमधुन पाच चोरटे दुकानात चोरी करताना दिसत आहेत. पाचही चोरट्यांचे फुटेज घेऊन त्यावरून स्केच बनविण्यात येत असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
असूने पोलिस अधिक तपास करीत आहेत.