पुणे : बाणेर भागातील एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि दागिने असा ५ लाख १८ हजारांचा ऐवज लांबविला.
या प्रकरणी विनय ताम्हाणे (वय २८, रा. भक्ती अँबियन्स, वीरभद्रनगर, बाणेर) यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ताम्हाणे आणि त्यांची आई शुक्रवारी सकाळी नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी ताथवडे येथे गेले होते. या दरम्यान चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील १७ हजारांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा ५ लाख १८ हजारांचा ऐवज लांबविला. ताम्हाणे दुपारी चारच्या सुमारास घरी परतले. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पवार तपास करत आहेत.
हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातून १५५ तोळे सोन्याचे दागिने, रोकड, परकीय चलन असा ८८ लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली.