पिंपरी : हत्याराच्या सहाय्याने कुलूप तोडून दरवाजा उघडत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून ७२ हजारांच्या ३० ग्रॅम सोन्याच्या दोन बांगड्या चोरटयांनी लंपास केल्या आहेत. येळवंडे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी दीड ते रात्री साडे अकराच्या दरम्यान घरफोडीचा हा प्रकार घडला आहे. लवीना पुरुषोत्तमदास मानसिंगानी (वय २९, रा. हिंजवडी ) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या रूमचा दरवाजा हा कडी-कोयंडा कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रूमच्या दरवाज्याचे कुलूप हत्याराच्या सहाय्याने तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. ७२ हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरट्यांनी चोरून नेल्या.