शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 9:22 PM

जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुनर्जीवित होऊ शकेल...

ठळक मुद्देपुनरुज्जीवन अहवाल : कारखान्याकडे आहे २४८ एकरचा भूखंड

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवन पाहणी अहवालात कारखान्याच्या तब्बल अडीचशे एकर जमिनीची पुस्तकी किंमत अवघी दोन कोटी ५१ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. विशेष लेखापरिक्षकाने केलेल्या पाहणीत केवळ १२१ एकर जमिनीचे बाजार मूल्य अडीचशे कोटी रुपये दाखविले आहे. जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुरुज्जीवीत होऊ शकेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.  शहराच्या हद्दी पासुन दहा किलोमीटरवर ३५०० टन ऊसाची गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखान्याची उभारणी १९६६ साली वीस हजार शेतकºयांनी केली. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊसाचे देणे दिले नाही म्हणुन सरकारने एप्रिल २०११ रोजी कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. ताबा घेतेवेळी यशवंतवर राज्य सहकारी बँकेचे १८ कोटी रुपये कर्ज होते व त्या पोटी २४८ एकर जमीन तसेच कारखाना व डिस्टलरी तारण होते.कारखाना ताब्यात घेतल्यानंतर तो सुरु करण्यात सरकार अपयशी ठरले. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१७ रोजी कारखाना अंतरीम अवसायनात काढला. त्यास शेतकºयांनी हरकत घेत, लोक वर्गणीतून कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी यशवंत कारखाना कायम स्वरुपी अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या पुर्वी २ नोव्हेंबरला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरु व्हावे या करीता मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यात २४८ एकर जमिनीचे मूल्य अडीच कोटी दाखविले आहे. कारखान्याचे नकत मूल्य उणे ११९ कोटी रुपये दाखविण्यात आले, तसेच संचित तोटा १३८ कोटी दाखविण्यात आला. कारखाना २०११ मधे बंद पडला. त्यावेळी मुल्य उणे ३१ कोटी तसेच संचित तोटा ५० कोटी होता व शासनाने कब्जा केल्यावर मूल्यात तसेच तोटा वाढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे म्हणाले. राज्य सहकारी बँकेला व्याजासह २८ कोटी रुपयांचे देणे आहे. मात्र, त्यांनी ३०० कोटी रुपयांची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांनी त्यांचे कर्ज वसूल करण्याइतकी जमीन विक्री करणे अपेक्षित असल्याचे पांडे म्हणाले. ......................संस्था अवसायानात काढताना तिच्या स्थावर मालमत्तेचे बाजारभावानुसारचे मूल्य ग्राह्य धरले पाहीजे. तसे झाले असते तर यशवंत कारखान्याचे नक्त मूल्य वाढले असते. त्यामुळे कारखाना पुनरुज्जीवीत करणे शक्य झाले असते. कारखान्याच्या १२१ एकरची किंमत बाजारभावानुसार अडीचश्े कोटी रुपये होत असेल तर अडीचशे एकरनुसार कारखान्याचे मूल्य आणखी वाढेल. योगेश पांडे, प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने