पुणे : प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. जून २०१०मध्ये सरकारने भाषा सल्लागार समिती स्थापन करून न्या. नरेंद्र चपळगावकर यांना अध्यक्ष केले. प्रशासनाचे सहकार्य नसल्याचा ठपका ठेवत त्यांनी आठ महिन्यांनी राजीनामा दिला. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली २७ सदस्य समिती सरकारने स्थापन केली. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन भाषा सल्लागार समिती स्थापन झाली. विविध खात्यांची प्रारूप मसुद्याबाबत मते, आक्षेप, सूचना यावर विचार करून समितीकडून भाषा धोरण मसुदा अंतिम स्वरूपात नोव्हेंबर २०१६मध्ये मराठी भाषा विभागाकडे सादर झाला. पण कार्यवाही झालेली नाही.
भाषा धोरण त्वरित जाहीर करावे; मराठी साहित्य महामंडळाचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:59 PM
प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे.
ठळक मुद्देसरकारने स्थापन केली डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली २७ सदस्य समितीआठ वर्षे होत आली तरीही भाषा धोरण जाहीर केलेले नाही : श्रीपाद जोशी