दि. ९ मार्च २०२१
तळेघर वार्ताहार: बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेञ भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथे असलेला पाझर तलाव गत वर्षापेक्षा चालुवर्षी पुर्ण क्षमतेने भरला होता यामुळे सध्या तरी या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी या पाझर तलावातुन पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. या पाझर तलावामध्ये साचलेला गाळ काढुन या पाझर तलावाची गळती बंद करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये वसलेल्या भीमाशंकर खोर्यामध्ये गेल्या आठ नऊ वर्षा पुर्वी पावसाळा सोडल्यास बैलगाडी व टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. या परिसरातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत होती. परंतु काही वर्षापुर्वी तेरुंगण येथे हा पाझर तलाव काढण्यात आल्याने श्री क्षेञ भीमाशंकर व या परिसरातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. या पाझर तलावातुन तेरुंगण, ढगेवाडी, पालखेवाडी, म्हातारबाचीवाडी, निगडाळे, भक्त निवास परिसर, भीमाशंकर या गावांना पाणी पुरवठा केला जातो.
श्री क्षेञ भीमाशंकर हे बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक ज्योर्तिर्लिंग असल्याने या ठिकाणी होणारी गर्दी पाहता त्याच प्रमाणे या परिसरातील पाण्याची गरज लक्षात घेता या पाझर तलावातुन या परिसरातील गावांना पाणी पुरत नसल्यामुळे त्याच प्रमाणे या तलावात गाळ साचल्यामुळे गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते भीमाशंकर व परिसरासाठी वर्षभर ५.५६ एम.एस.एफ.टी.पाणी लागणार असल्याची गरज लक्षात घेवुन या तलावाला ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला २०११साली महसुल विभाग व छोटे पाटबंधारे विभागाकडुन येथील पाझर तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे या तलावाच्या साठवण क्षमतेत चार पटीने वाढ झाली.या तलावातुन दररोज सुमारे २ लाख ६० हजार लिटर पाणी पुरवठा होत होता. परंतु गेल्या सहा सात वर्षामध्ये या भागामध्ये मुसळभार पडणार्या पावसाच्या पाण्या बरोबरच मोठ्या प्रमाणात या पाझर तलावात माती वाहुन येवुन भव्य असा गाळाचा संचय झाला आहे ह्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गाळ साचल्यामुळे पाण्याची पातळी कमी होऊन गळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या तलावातुन पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
जस जसा उन्हाळा वाढत आहे तस तशी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.या वर्षी जास्त पाऊस होऊनही लवकरच पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. .
या पुर्वी भीमाशंकर व भीमाशंकर परिसरातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती तेरुंगण येथील पाझर तलाव होताच ह्या परिसरातील आदिवासी शेतकर्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला परंतु गेले कित्येक वर्ष या भागात पडणार्या मुसळधार पावसाबरोबरच माती वाहुन आल्याने ह्या पाझर तलावाची साठवण क्षमता कमी होऊन गळती वाढली आहे. ह्या पाझर तलावातुन गाळ काढून ह्या पाझर तलावाची खोली वाढविली असता भीमाशंकर व ह्या परिसरातील आदिवासी जनतेचा पिण्याच्या पाण्या बरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटेल"
जितेंद्र गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील श्री क्षेञ भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथील पाझर तलावामध्ये गाळ साचल्यामुळे या पाझर तलावातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.