शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

'मार्च एंड'च्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर 'घोळ' ; पुणे महापालिका आयुक्तांकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 9:38 PM

एका उपायुक्तांसह, दोन सहाय्यक आयुक्त, १७ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस 

पुणे : पालिकेकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांचे 'पोस्टमार्टेम' सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या 'थर्ड पार्टी'कडून पालिकेलाच चुना लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करताच मोजमापे आणि दर्जा प्रमाणित करण्यात आल्याचे समोर आले आहे. यासोबतच कामे अर्धवट सुरू असतानाही बिले सादर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून तब्बल १९ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये एक परिमंडळ उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, तीन सहायक अभियंता आणि ११ कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. नोटीसीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाणार असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४० टक्केच कामे करण्यात आली आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटी मर्यादीत कामांना परवानगी देण्यात आली. पालिका आयुक्तांनी वित्तीय समितीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले होते. शेवटच्या टप्प्यात १९ मार्चपर्यंतच कामांचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि २५ मार्चपर्यंत बिले सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या कामांमध्ये होणारा 'झोल' लक्षात घेता यंदा कामांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी एक विशेष दक्षता पथकही नेमण्यात आले.      या दक्षता पथकाने २३ कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. कागदपत्रेही तपासण्यात आली. यावेळी अनेक कामांमध्ये गोंधळ असल्याचे लक्षात आले. कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अशास्त्रीय कामे झाल्याचे समोर आले.  या कामांचा पहिला अहवाल २२ मार्चला तर दुसरा अहवाल ३१ मार्चला आयुक्तांना सादर करण्यात आला होता. ‘थर्ड पार्टी ऑडीट’च्या कामांची गुणवत्ता राखण्यासाठी करावी लागणारी मालाची तपासणी व अन्य बाबींवर थर्ड पार्टी ऑडीटरने लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र, कोणत्या विकास कामांसाठी कोणता ऑडीटर नेमला आहे, याची माहितीच कनिष्ठ अभियंत्यांपासून उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांनाही नसल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून शहरातील आणखी कामांची तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. ---------१. रस्त्यांच्या कामाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले नाहीत. २. कामासाठी वापरलेला माल प्रमाणीत असल्याबाबतचेही अहवाल जोडण्यात आलेेले नाहीत. ३. एका ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रवाहच उताराच्या विरूद्ध दिेशेने नेण्यात आला आहे. ड्रेनेजचे पाणी चेंबरमधून घरांमध्ये शिरेल, अशा पद्धतीने काम झाले आहे.४. कामे पुर्ण झालेली नसताना बिलांसाठी फाईल सादर करण्यात आल्या.     

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त