विवेक भुसे
पुणे : ऊन, वारा, पावसात भर रस्त्यात उभे राहून वाहनांचे प्रदूषण झेलत वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस सर्वसामान्य पुणेकरांकडून कायमच दुर्लक्षित राहिले आहेत़ भर पावसात थांबून ते करीत असलेल्या कामामुळे आपण या वाहतुकीच्या चक्रव्युहातून बाहेर पडून सुखरूप घरी जाऊ शकतो, या त्यांच्या कामाबद्दल धन्यवाद देण्याचे सोडाच पण त्याने एखाद्याला वाहतूक नियमांचा भंग केला म्हणून अडविल्यास त्यांचा इगो दुखाविला जातो व ते या पोलिसांना शिवीगाळ करतात़ त्यांच्यावर हात उगारण्यासही मागे पुढे पाहात नाही़ यावेळी चौकात असंख्य लोक असतानाही कोणीही या पोलिसांच्या मागे उभे राहात नाही़ एका बाजुला वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर वाहतूक पोलीस तसेच अन्य पोलीस कर्मचारी, पीएमपी बसचालक, एसटी बसचालक यांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे़
या वर्षभरात नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत शहरात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून १४७ गुन्हे दाखल असून तब्बल १०१ पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की अथवा मारहाण करण्यात आली आहे़ हेच प्रमाण गेल्या वर्षी २०१७ मध्ये एकूण १२८ अशा घटना होत्या़ त्यात ७९ पोलीस कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागला होता़बंडगार्डन येथे वाहतूक शाखेचा एक कर्मचारी वाहतूक नियमन करत असताना एका आलिशान गाडीतून दोघे जण आले़ त्यांनी सीटबेल्ट न लावल्याने कर्मचाºयांनी त्यांना अडविले़ एका साधा शिपाई आपल्याला अडवितो म्हणजे काय, असा पवित्रा त्यांनी घेतला व मी कोण आहे तुला माहिती का, असा उलट त्या पोलिसास प्रश्न केला़ त्यांना दंड भरायला सांगितला तर त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत गाडी अंगावर घातली़ सुदैवाने हा पोलीस कर्मचारी सावध असल्याने तो बाजूला झाला़ शेवटी त्यांची गाडी खडकीला पकडण्यात आली व त्यांची गाडी खडकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली़ तरीही आमची यांच्याशी ओळख आहे वगैरे ते सांगत होते़ शेवटी बंडगार्डन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली़हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे़ चौकात सर्व बाजूने वाहनांच्या हॉर्नचे आवाज सहन करीत, दिवसरात्र वाहनांची गर्दी नियंत्रित करण्याचे काम वाहतूक शाखेच्या पोलीस दिवसभर काम करीत असतात़ सकाळी लवकर सुरू होणारी ड्युटी त्यात सलग उन्हा तान्हात रस्त्यावर उभे राहिले असताना तासा दोन तासानंतर थोडा वेळ बाजूला जावे तर जवळपास काहीही सोय नसते़ नैसर्गिक कामासाठी थोडा वेळ बाजूला जावे लागले तरी जवळपास स्वच्छतागृहाची सोय असेलच असे नाही़ त्यातून काही कारणाने चौक सोडून जायचे म्हटले तरी, त्याच काळात काही घटना घडली अथवा वरिष्ठ अधिकारी त्याचवेळी चौकात आले तर ही टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असते़दिवसभरात अनेक तास वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्नचे आवाज ऐकून अनेक वर्षे वाहतूक शाखेत काम करणाºया पोलिसांना अनेक आजार जडतात़ ते कोणीही लक्षात घेत नाही़ इतर कोणत्याही ड्युटीपेक्षा ही रस्त्यावरची ड्युटी खूप वेगळी आहे़ शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक समस्या दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत़ महापालिकेने वेळीच त्यावर योग्य उपाययोजना न केल्याने ही समस्या वाढत आहे़ याकडे कोणीही न पाहाता त्याचा सर्व दोष पोलिसांना दिला जातो़याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, पोलिसांना सौजन्याने आणि संयमाने वागण्याच्या सूचना दिल्या आहेत़ पोलिसांना लक्ष्य करण्याच्या घटनांचा काटेकोर तपास करून न्यायालयात दोषारोप पाठविण्याच्या सूचना पोलीस अधिकाºयांना दिल्या आहेत़ गुन्हेगारांना शिक्षा होईल, यासाठी आवश्यक तांत्रिक पुरावा जोडण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत़ अशा खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल़स्पाय कॅमेºयांची संख्या वाढविणार४या घटनांमध्ये पुरावा उपलब्ध व्हावा़ तसेच वाहनचालकांवर जरब बसावी, यासाठी वाहतूक पोलिसांना स्पाय कॅमेरे देण्यात आले आहेत़ त्याची संख्या वाढविण्यात येत आहे़४काही दिवसात शहरात हेल्मेटसक्ती लागू करण्यात येणार आहे़ पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध होत आहे़ त्यामुळे १ जानेवारीनंतर हेल्मेट नसेल तर पोलीस कारवाई करु लागले तर त्याला विरोध होऊन वादावादीच्या संख्या वाढण्याची शक्यता आहे़सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल नोव्हेंबरअखेर दाखल झालेले गुन्हेवर्ष पोलीस कर्मचारी इतर एकूण२०१८ १०१ ४६ १४७२०१७ ७९ ४९ १२८