शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यबाजार व उपबाजार तळेगाव ढमढेरे यार्डवर मुगाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झालेली असून बाजारभावही चांगले निघत आहेत. मुख्यबाजार शिरूर येथे यार्डवर आवक झालेल्या मुगाच्या लिलावाची पाहणी बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतकाका कोरेकर यांनी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मूग व इतर शेतमालास जास्तीत जास्त कसा भाव देता येईल, याबाबतच्या सूचना आडतदार व व्यापाऱ्यांना दिल्या. या वेळी सभापती ॲड. वसंतकाका कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, माजी सभापती व शाशिकांत दसगुडे, सचिव अनिल ढोकले, व्यापारी प्रकाश सुराणा, संतोष सुराणा यासह शेतकरी ग्राहक उपस्थित होते.
सर्वांनी मूग विक्रीसाठी आणताना वाळवून, चाळणी करून ५० किलो पर्यंतचे बारदानामध्ये आणावा. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल असे आवाहन या वेळी सभापती व संचालक मंडळाच्या वतीने सचिव अनिल ढोकले यांनी शेतकऱ्यांना केले.