पुणे : मार्केटयार्डात रविवारी फुलांचा बाजार दस-या मुळे फुलला आहे. मागील वर्षा पेक्षा यंदा फुलांची आवक वाढली आहे. मागील वर्षी पावसामुळे फुलांची आवक कमी होती. यंदा पाऊस नसल्याने फुलांची लागवड शेतक-यांनी केली असून फुलांचा बाजार फुलला असून भाव ही तेजीत आहेत. परंतु, एकीकडे घाऊक बाजारात कमी भाव मिळत असताना किरकोळ बाजारात मात्र फुलांची विक्री चढ्या भावाने केली जात आहे. सणसुदीच्या नावाखाली फुलांची किरकोळ विक्री चढ्या भावाने केली जात आहे. शेतकऱ्यांना कमी भाव तर सर्वसामान्य नागरिकांना चढ्या भावाने फुलांची खरेदी करावी लागत आहे. सणवाराच्या नावाखाली विक्रेत्यांकडून फुलांची मार्केटींग करून फुल चढ्या भावात विक्री केली जात असल्याने दस-याला फुलांचा बाजार तेजीत आहे.
दोन दिवसांवर दसरा आल्याने फुलांची मोठी आवक झाली. घाऊक बाजारात झेंडूला १० ते २० रुपये किलो, तर शेवंतीला १०० रुपये भाव मिळत होता. मात्र, शेतक-यांनी अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. किरकोळ बाजारात मात्र फुलांचे भाव तेजीत आहेत परिणामी, भावात काहीशी वाढ झाली आहे.
मंगळवारी (दि. २४) दसरा आहे. रविवारी आणि सोमवारी फुलांची मोठी आवक होणार आहे. दरम्यान, किरकोळ बाजारात मात्र, फुलांची चढ्या भावाने विक्री होत आहे. किलोला १०० ते २०० रुपये भाव मिळत आहे.
चमेलीनी खाल्लला भाव
नवरात्रोत्सवात देवीला चमेली फुले वाहली जातात. जुई , चमेली सुगंध चांगला असल्याने ठरावीक ग्राहक चमेली खरेदी करतात. शनिवारी चमेली व जुईची आवक १३ ते १५ किलो झाली असून घाऊक बाजारात १३०० ते १४०० किलोला भाव मिळाला आहे. अशा फुलांचा भाव जास्त असल्याने आवक कमी असते.